शिवसेनेत बाळासाहेबांनी कधी जातीपातीला थारा दिला नाही : सुभाष देसाई

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. याने लोकांचं दळणवळणाचं साधनही सोपं झालं आहे. भारताची जी लेकरं आहेत त्यांचं हित बाळासाहेबांनी पाहिलं. काश्मिरी पंडितांनाही त्यांनी न्याय दिला. त्यांनी कश्मिरी पंडितांच्या मुलांसाठी काही जागा राखून ठेवा असे निर्देशही बाळासाहेबांनी त्यावेळेच्या सरकारला दिले होते.

    मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची जयंती (Birth Anniversary) हा भारतासाठीचा एक महत्त्वाचा दिवस. भारताची सेवा केली. भारताचं नाव उज्जवल केलं त्यामुळे बाळासाहेबांना हा देश विसरणं शक्य नाही. शिवसेनेत बाळासाहेबांनी कधी जातीपातीला थारा दिला नाही. त्यामुळे तळागाळातील लोकही जे दुर्लक्षित होते अशा लोकांना सोबत घेऊन त्यांना मानाची पदं दिली आणि त्यांना मोठं केलं. स्वत: कडे एकही पद घेतलं नाही. त्यांनी  विकासाचा विचारही केला. विकासालाही प्राधान्य दिलं. त्यावेळी जे प्रकल्प उभे राहिले त्याला बाळासाहेबांनी पाठिंबा दिला.

    मुंबई-पुणे एक्सप्रेस वे हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. याने लोकांचं दळणवळणाचं साधनही सोपं झालं आहे. भारताची जी लेकरं आहेत त्यांचं हित बाळासाहेबांनी पाहिलं. काश्मिरी पंडितांनाही त्यांनी न्याय दिला. त्यांनी कश्मिरी पंडितांच्या मुलांसाठी काही जागा राखून ठेवा असे निर्देशही बाळासाहेबांनी त्यावेळेच्या सरकारला दिले होते.

    आज मुंबई विद्यापीठाने बाळासाहेब ठाकरे अध्यासनही स्थापन केलं आहे. मुंबई विद्यापीठातर्फे आज नवदुर्गा या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या पुस्तकाचं प्रकाशन बाळासाहेबांचे नातू आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं. या अध्यासनाने हे पुस्तक प्रकाशित करून त्याचं काम सुरू झाल्याचं अधोरेखित केलं आहे.

    शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्राला जे वेळोवेळी मार्गदर्शन केलं आहे. त्या अनुशंगानेच पुढची वाटचाल सुरू आहे. यामुळे त्यांच्या कारकिर्दीत चांगलं काम होणार आहे असा मला विश्वास वाटतो.