शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार असल्याने केंद्राची सरकार बरखास्त करण्याची हिंमत नाही : संजय राऊत

बाळासाहेबांच्या कार्यकाळातला पंतप्रधान शेतकऱ्यांनी अडवला म्हणून परत आला. या काळात पंतप्रधान शेतकऱ्यांना घाबरुन परत आले. राज्यात विरोधी पक्ष रोज सरकार बरखास्तीची मागणी करतो आहे. सरकार दोन वर्ष चांगलं काम करतंय. उद्धव ठाकरे सातत्याने मेरिट लिस्टमध्ये येतायेत. विरोधक वैफल्यातून आरोप करतायेत.

    मुंबई : बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) सतत तरुणांना प्रेरणा दिली. देशभरात शिवसेनेविषयी (ShivSena) आस्थेने विचारणारी तरुणाई आजही आहे.शिवसेनेची ताकद ही तरुणाई आहे. बाळासाहेबांनी काय केलं हा प्रश्न येणार नाही शिवाजी महाराजांचं काम बाळासाहेबांनी पुढे नेलं. बाळासाहेबांची तुलना शिवाजी महाराजांशी केली. पाकिस्तानच्या सीमा महाराष्ट्रापर्यंत येवू शकल्या असत्या पण बाळासाहेब होते म्हणून महाराष्ट्र महाराष्ट्र राहिला.

    शिवसेनेचं महत्त्व बाळासाहेबांमुळे

    बाळासाहेबांच्या कार्यकाळातला पंतप्रधान शेतकऱ्यांनी अडवला म्हणून परत आला. या काळात पंतप्रधान शेतकऱ्यांना घाबरुन परत आले. राज्यात विरोधी पक्ष रोज सरकार बरखास्तीची मागणी करतो आहे. सरकार दोन वर्ष चांगलं काम करतंय. उद्धव ठाकरे सातत्याने मेरिट लिस्टमध्ये येतायेत. विरोधक वैफल्यातून आरोप करतायेत. शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार असल्याने केंद्राची हिंमत नाही, सरकार बरखास्त करण्याची.

    सरकार आणि मुख्यमंत्री ठणठणीत आहे

    दिल्लीतील वातावरण गढूळ झाले आहे.नेताजींच्या पुतळ्याचं कौतुक, पण देशाचा इतिहास रोज बदलला जातो. गेल्या ७० वर्षांत काही झालं नाही हे सांगणं चुकीचं आहे. नेताजींसारखंच काम बाळासाहेबांनी केलं. दिल्लीत नेताजींप्रमाणेच बाळासाहेबांचा पुतळा करायला हवा.