बाळासाहेब ठाकरेंची बहिण संजीवनी करंदीकर यांचे पुण्यात निधन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शोक व्यक्त

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचे आज पुण्यात निधन झाले. त्या ८४ वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील व्यक्तिकडून श्रद्धांजली वाहिण्यात आली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आत्या संजीवनी करंदीकर यांच्या जाण्याने मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. संजूआत्याही आम्हा सगळ्यांना तेवढ्याच मायेने वागवत आल्या. त्यांच्या जाण्याने ठाकरे कुटुंबाने मायेचे छत्र गमावले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!" असं मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेसात म्हटलेयं

    मुंबई : प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचे आज पुण्यात निधन झाले. त्या ८४ वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील व्यक्तिकडून श्रद्धांजली वाहिण्यात आली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आत्या संजीवनी करंदीकर यांच्या जाण्याने मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. संजूआत्याही आम्हा सगळ्यांना तेवढ्याच मायेने वागवत आल्या. त्यांच्या जाण्याने ठाकरे कुटुंबाने मायेचे छत्र गमावले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!” असं मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेसात म्हटलेयं

    दरम्यान, मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, संजीवनी करंदीकर या आमच्या आत्या होत्याच, पण प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या व शिवसेनाप्रमुखांच्या भगिनी होत्या. त्यांना एक समृद्ध वारसा लाभला व त्यांनी तो शेवटपर्यंत जपला. त्यांच्या जाण्याने शेवटचा दुवाही निखळला. संजूआत्या म्हणून त्या ठाकरे कुटुंबात प्रख्यात होत्या. प्रबोधनकारांप्रमाणेच त्या परखड होत्या. वाचनाचा छंदही अफाट होता. प्रबोधनकारांच्या अनेक गोष्टी त्या आम्हाला सांगत. सगळ्यात छोटी बहीण म्हणून शिवसेनाप्रमुखांचा संजूआत्यावर विशेष लोभ होता व संजूआत्याही आम्हा सगळ्यांना तेवढ्याच मायेने वागवत आल्या. त्यांच्या जाण्याने ठाकरे कुटुंबाने मायेचे छत्र गमावले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!”

    तर प्रबोधनकार ठाकरे यांची कन्या, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनीताई करंदीकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून संजीवनीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. संजीवनीताईंच्या माध्यमातून प्रबोधनकारांच्या तसंच बाळासाहेबांच्या अनेक वैयक्तिक आठवणींना उजाळा मिळायचा. त्यांच्या निधनानं बाळासाहेबांच्या भावंडांतील अखेरचा दूवा निखळला आहे. ठाकरे व करंदीकर कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी असून हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या परिवाराला मिळो. संजीवनीताईंच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.