
२०१९ साली राधाकृष्ण विखे-पाटील हे पहिल्यांदा खिंड सोडून पळाले, असा घणाघाती आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. संगमनेर या ठिकाणी ते पत्रकारांशी संवाद साधत होते. मी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची देखील संवाद साधणार असल्याचा थोरात यांनी सांगितलं असून विविध विषयांना त्यांन हात घातला आहे.
अहमदनगर– विधान परिषदे निवडणुकीच्या (MLC ELECTION) निमित्ताने नगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच या जिल्ह्यात विखे-पाटील (Vikhe patil) व थोरात (Thorat) यांचे वर्चस्व राहिले आहे. दरम्यान, विखे पाटलांनी २०१९ साली काँग्रेसला रामराम केल्यानंतर त्यांनी भाजपाची वाट धरली. त्यानंतर थोरात व राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात शाब्दिक चकमक, आरोप प्रत्यारोप व टिका टिपण्णी होत आहे.
विखे-पाटील खिंड सोडून पळाले…
दरम्यान, काल थोरातांचे आजारानंतर नगर जिल्ह्यात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. २०१९ साली राधाकृष्ण विखे-पाटील हे पहिल्यांदा खिंड सोडून पळाले, असा घणाघाती आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. संगमनेर या ठिकाणी ते पत्रकारांशी संवाद साधत होते. मी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची देखील संवाद साधणार असल्याचा थोरात यांनी सांगितलं असून विविध विषयांना त्यांन हात घातला आहे. तसेच महाविकास आघाडीला राज्यात पोषक वातावरण असल्याचा देखील बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितलं.
सत्यजीत काँग्रेस आमदार असता तर…
आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठा फायदा देखील होईल, असे देखील थोरात यांनी स्पष्ट केले आहे. सत्यजित तांबे यांच्याशिवाय काँग्रेसला करमणार नाही व काँग्रेस शिवाय सत्यजीतला करमणार नाही असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. तसेच सत्यजीत हा काँग्रेस आमदार म्हणून निवडून आला असता तर अधिक समाधान वाटले असते असं थोरात म्हणाले. पहाटेचा शपथविधी शरद पवारांना अगोदरच माहिती असेल तर त्यांनाच तो प्रश्न विचारलेला बरा असं सुद्धा बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले.