आमचं ठरलंय – आगामी अधिवेशनात काँग्रेसचाच माणूस होणार विधानसभा अध्यक्ष, बाळासाहेब थोरातांनी केलं स्पष्ट

नवा विधानसभा अध्यक्ष (Maharashtra Legislative Assembly Speaker )बुधवारपासून होणाऱ्या पाच दिवसांच्या अधिवेशनात मिळेल. तो अध्यक्ष काँग्रेस पक्षाचाच असेल. मात्र अद्याप अध्यक्ष कोण असेल ते निश्चित झाले नसून पक्ष म्हणून चर्चा करुन ठरवू, असा विश्वास महसूलमंत्री आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केला आहे.

    मुंबई : राज्य विधिमंडळात नाना पटोले (Nana Patole) यांनी राजीनामा दिल्यानंतर नवा विधानसभा अध्यक्ष (Maharashtra Legislative Assembly Speaker )बुधवारपासून होणाऱ्या पाच दिवसांच्या अधिवेशनात मिळेल. तो अध्यक्ष काँग्रेस पक्षाचाच असेल. मात्र अद्याप अध्यक्ष कोण असेल ते निश्चित झाले नसून पक्ष म्हणून चर्चा करुन ठरवू, असा विश्वास महसूलमंत्री आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केला आहे.

    पुण्यात भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी काल केलेल्या टीकेसंदर्भात प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की,  राज्यातील आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांचे ऑटो रिक्षावाले सरकार पंक्चर असून हे सरकार हलतही नाही फक्त धूर सोडते, अशी टिका शहा यानी केली होती. त्यावर थोरात म्हणाले की, महाराष्ट्रात तिन्ही पक्षांच्या सरकारचे चांगले काम सुरू आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना अनेकदा सरकार पडेल असे वाटूनही हे सरकार टिकून आहे आणि त्यामुळेच त्यांचा भ्रमनिरास झाला आहे असे ते म्हणाले.