
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या तैलचित्राचे अनावरण विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात आज झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तैलचित्राचे अनावरण केले. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.
मुंबई – बाळासाहेब मुंबईच्या महासागरासारखे होते. गरज असेल तेव्हा तुफान कधी शांत आणि अथांग तसे खोलही व्यक्तिमत्व होते तसेच त्यांचे विचार होते. सभागृहाचा त्यांना मोह नव्हता. व्यक्तीला त्यांना ओळखता येत होते. बाळासाहेबांचे मोठेपण विरोधकांनीही अनुभवले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या तैलचित्राचे अनावरण विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात आज झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तैलचित्राचे अनावरण केले. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.
बाळासाहेब मुंबईच्या महासागरासारखे
देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाळासाहेब मुंबईच्या महासागरासारखे होते. गरज असेल तेव्हा तुफान कधी शांत आणि अथांग तसे खोलही व्यक्तिमत्व होते तसेच त्यांचे विचार होते. सभागृहाचा त्यांना मोह नव्हता. व्यक्तीला त्यांना ओळखता येत होते. बाळासाहेबांचे मोठेपण विरोधकांनीही अनुभवले. समाजातील सर्वस्थरात बाळासाहेबांबद्दल आत्मियता होती.
तत्वासाठी बाळासाहेबांचे राजकारण
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजकारणात असे फार कमी लोक आहे ज्यांना एकदा बोललेले वाक्य परत घेण्याची वेळ येत नाही. ते बाळासाहेब ठाकरे आहेत. बाळासाहेब ठाकरे काळ्या दगडावरील पांढरी रेष होते. त्यांनी जे बोलले ते मागे घेतले नाही. राजकीय बेरजेसाठी त्यांनी राजकारण केले नाही. तत्वासाठी राजकारण केले. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाला देशातही मान्यता मिळाली. त्यामुळे अनेक तरुण झपाटून गेले होते.