राष्ट्रवादीचे प्रभारी बाळया मामांनी सोडले केंद्रीय मंत्र्यावर टिकास्त्र

भिवंडी लोकसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादीचे प्रभारी म्हणून सुरेश म्हात्रे उर्फ बाळया मामा यांची नियुक्ती झाली आहे. भिवंडी लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादीने दावा केला आहे.

    कल्याण : जे बोलले जाते त्याची कृती दिसत नाही. विकास कामावरुन भिवंडी राष्ट्रवादीचे लोकसभा प्रभारी बाळ्या मामा यांनी केंद्रीय पंचायत मंत्री कपील पाटील यांच्यावर टोला लगावला आहे. प्रभारी पदी नियुक्ती झाल्यानंतर कल्याणमध्ये राष्ट्रवादीने त्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन पाटीदार भवनात करण्यात आले होते. बाल्या मामा हे भिवंडी लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार आहे.

    भिवंडी लोकसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादीचे प्रभारी म्हणून सुरेश म्हात्रे उर्फ बाळया मामा यांची नियुक्ती झाली आहे. भिवंडी लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादीने दावा केला आहे. ही जागा राष्ट्रवादीला मिळाली तर बाळ्या मामा हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. या या पार्श्वभूमीवर शहाड पाटीदार भवनात कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून बाळया मामा यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बाळ्या मामा सह राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हा अध्यक्ष वंडार पाटील, पदाधिकारी संदीप देसाई, उमेश बोरगांवकर, सारीका गायकवाड, दिनेश परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी बाळ्या मामा यांनी सांगितले की, दोन महिन्यापूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठराव करुन भिवंडी लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळावी. त्यानंतर शरद पवार साहेबांनी इंडिया आघाडीला ज्या काही ११ जागा मागितल्या आहे. त्यामध्ये भिवंडी लोकसभेची जागाही मागितली आहे. कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. भिवंडी लोकसभेची जागा राष्ट्रवादीला नक्कीच मिळेल.

    काेट्यावधीचे कामे झाली आहेत. हा दावा कपील पाटील यांचा आहे. तुम्ही त्यांची भाषणे ऐकण्याएवजी प्रत्यक्षात जाऊन पाहून बघा. २०१९ ला मुरबाड रेल्वे सुरु करण्याचा कार्यक्रम झाला होता. पुन्हा एकदा त्याच रेल्वेची चर्चा पंधरा दिवसापूर्वी झाली. हे जे काही बोलले जाते. प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची कृती ना कल्याणमध्ये ना भिवंडीत दिसून येत आहे. भिवंडीत रस्त्याची दुरावस्था पाहिली तर एका ठेकेदारावर गुन्हा झाला. कुठेही काम यांच्या मार्फत झालेले नाही. अनेक वेळा संसद पटू सुप्रिया ताई झाल्या. यांना का मिळाला नाही असा सवाल उपस्थित केला आहे.