मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरेच्या संकल्पनेतून वांद्रे रिक्लेमेशनला नव्या वर्षानिमित्त आकर्षक रोषणाई!

वांद्रे रिक्लेमेशन येथे वांद्रे वंडरलँडच्या अंतर्गत अत्यंत आकर्षक ही रोषणाई करण्यात आली आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. ही रोषणाई रिलायन्स जिओ आणि एमएसआरडीसी यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे.

    मुंबई : राज्याचे पर्यटनमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून ख्रिती बाधंवाच्या प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून ख्रिसमस आणि नव्या वर्षाचे स्वागत केले जात आहे. यासाठी आकर्षक रोषणाई करत मुंबईकरासह देशी विदेशी पाहुण्याना नव्या वर्षाच्या स्वागतासाठी वांद्रे रेक्लमेशन येथे आकर्षित केले जात आहे.

    नियमांचे पालन करुन रोषणाईचा आनंद घ्या
    वांद्रे रिक्लेमेशन येथे वांद्रे वंडरलँडच्या अंतर्गत अत्यंत आकर्षक ही रोषणाई करण्यात आली आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. ही रोषणाई रिलायन्स जिओ आणि एमएसआरडीसी यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे. २ जानेवारीपर्यंत मुंबईकर वांद्रे वंडरलँडचा आनंद घेऊ शकतील मात्र राज्य सरकारचे निर्बंध लक्षात घेऊन सावधगिरी बाळगावी आणि नियमांचे पालन करुन या आकर्षक रोषणाईचा आनंद घ्यावा असे आवाहन पर्यटन विभागाने केले आहे.