eknath shinde and uddhav thackeray

शिंदे गटातील एका मंत्र्यांने गौप्यस्फोट करत नवीन वर्षात मोठ्या घडामोडी घडू शकतात, असा दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर होते. यावेळी शिंदे गटातील मंत्री, नेते उपस्थित होते. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार संपर्कात असल्याबाबतचे विधान केले आहे. 

    रत्नागिरी : राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार आले आहे. ते २०१९ मध्ये यायला हवे होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. यानंतर पुन्हा एकदा आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. यातच शिंदे गटातील एका मंत्र्यांने गौप्यस्फोट करत नवीन वर्षात मोठ्या घडामोडी घडू शकतात, असा दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर होते. यावेळी शिंदे गटातील मंत्री, नेते उपस्थित होते. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार संपर्कात असल्याबाबतचे विधान केले आहे.

    उदय सामंत म्हणाले, ‘ 10 ते 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी सरकार पडण्याचे दावे केले गेले. मात्र त्यात काहीही तथ्य नव्हतं. तेव्हा १७० हा आमचा मेजॉरीटी आकडा आहे. तेव्हाच मी दावा केला होता, आणखी १० ते १२ आमदार शिंदेंच्या संपर्कात आहेत. 180 ते 82 पर्यंत हा आकडा जाऊ शकतो. नव्या वर्षात नव्या राजकीय घडामोडी घडू शकतात.. धमाका पाच महिन्यांपूर्वीच झाला, त्याचे पडसाद नव्या वर्षात आणखी दिसू शकतात, असा दावा उदय सामंत यांनी केलाय.

    लांजा येथील नगरपरिषदेतील अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावर उदय सामंत म्हणाले, काही नगरसेवक नाही तर अख्खी लांजा नगरपरिषदच शिंदे गटात गेली आहे.