बँकांनी शेतकरी पीक कर्ज वाटपासाठी दिलेले उद्दिष्ट लवकर पूर्ण करावे – छगन भुजबळ

शेतकऱ्यांच्या (Farmer) मागणीनुसार राष्ट्रीयीकृत बँका (National bank) तसेच जिल्हा बँकांनी लवकरात लवकर शेतकरी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

    नाशिक : खरीपाच्या हंगामाला (Kharip) सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे, त्यामुळं शेतकऱ्यांना पीक तसेच बियाणांसाठी कर्ज लागते ते कर्ज बँकांनी कोणतीही आडकाठी न आणता पीक कर्ज (Pik karj) शेतकऱ्यांना द्यावे, असं माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी येवल्यातील (Yevala) पीक कर्ज वाटपासह विविध विकास कामांचा आढावा घेतलेल्या बैठकीत म्हटले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या (Farmer) मागणीनुसार राष्ट्रीयीकृत बँका (National bank) तसेच जिल्हा बँकांनी लवकरात लवकर शेतकरी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

    दरम्यान, बँकांना शासनाने दिलेले पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना पीक कर्जाबाबत असलेल्या अडचणी तातडीने सोडविण्यात याव्यात. शेतकऱ्यांना बियाणे तसेच खतवाटप करतांना अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. विक्रेत्याकडून शेतकऱ्यांना बियाणे खत खरेदी करतांना कुठल्याही इतर वस्तू खरेदी करण्याची सक्ती होणार नाही याकडे लक्ष द्यावे. विक्रेता सक्ती करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा सूचना सुद्धा भुजबळ यांनी केल्या.

    यावेळी तालुक्यातील पावसाचा आढावा घेऊन पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये पाणी टँकर सुरू ठेवावे तसेच अतिवृष्टी व पुरपरिस्थिती हाताळण्यासाठी तालुक्यातील यंत्रणेने सज्ज रहावे असे अशा सूचना छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,तहसीलदार प्रमोद हिले,तालुका उपनिबंधक प्रताप पाडवी, सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी, मुख्याधिकारी नागेंद्र मुतगेकर, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.शैलजा कृपास्वामी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हर्षल नेहेते, कृषी अधिकारी यांच्यासह शेतकरी व बँकेचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.