Banner of Sambhaji Raje supporters outside Shiv Sena Bhavan

राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने पाठिंबा न दिल्याने नाराज असलेल्या संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांनी शिवसेना भवनाबाहेर बॅनर लावून सेनेला डिवचले आहे. आज पुन्हा एकदा सिद्ध झाले, महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे 'छत्रपती शिवरायांचा'. शिवरायांचा गनिमी कावा वापरून छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार 'मावळ्यांचे' जाहीर आभार. राज्यसभा तो झाकी है, स्वराज्य मे २०२४ अभी बाकी है, असा मजकूर या बॅनरवर लिहला होता(Banner of Sambhaji Raje supporters outside Shiv Sena Bhavan).

    मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने पाठिंबा न दिल्याने नाराज असलेल्या संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांनी शिवसेना भवनाबाहेर बॅनर लावून सेनेला डिवचले आहे. आज पुन्हा एकदा सिद्ध झाले, महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे ‘छत्रपती शिवरायांचा’. शिवरायांचा गनिमी कावा वापरून छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार ‘मावळ्यांचे’ जाहीर आभार. राज्यसभा तो झाकी है, स्वराज्य मे २०२४ अभी बाकी है, असा मजकूर या बॅनरवर लिहला होता(Banner of Sambhaji Raje supporters outside Shiv Sena Bhavan).

    या बॅनरमुळे संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसेनेबाबत नाराजी असल्याचे दिसून येत आहे. मात्र, या सगळ्या प्रकारानंतर संभाजीराजे यांनी मौन सोडत आपल्या समर्थकांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

    समर्थकांनी माझ्या प्रेमापोटी जे फ्लेक्स लावले, त्यांच्या प्रेमाचा मी आदरच करतो. मात्र कोणत्याही पक्षाला खुन्नस म्हणून त्यांच्या कार्यालयासमोर अशी काही कृती करणे, हे माझ्या तत्वात बसत नाही. राजकारणात येणार असलो तरी ‘स्वराज्य’ला तत्वांची बैठक असेल, असे संभाजीराजे छत्रपती यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.