कंटेनरच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू; नानोली फाट्याजवळील घटना

वेगातील कंटेनरने धडक दिल्याने रस्त्यावर पडलेल्या दुचाकीवरील बाप लेकीला चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 30) दुपारी चार वाजताच्या सुमारास तळेगाव एमआयडीसी परिसरातील नानोली फाट्याजवळ घडला.

    पिंपरी : वेगातील कंटेनरने धडक दिल्याने रस्त्यावर पडलेल्या दुचाकीवरील बाप लेकीला चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 30) दुपारी चार वाजताच्या सुमारास तळेगाव एमआयडीसी परिसरातील नानोली फाट्याजवळ घडला.

    सुनील वाघमारे (25), आर्या सुनील वाघमारे (4) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत तर गणेश जाधव, परवीन वाघमारे (सर्व रा. टाकवेबुद्रुक, ता. मावळ) हे दोघेजण जखमी झाले आहेत. सुनील, आर्या, गणेश आणि परवीन असे चौघेजण दुचाकीवरून जात होते, नानोली फाट्याजवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून एका कंटेनरने धडक दिली. धडक बसल्यानंतर दुचाकी घसरून चौघेही रस्त्यावर पडले.

    भरधाव कंटेनरने त्यातील सुनील आणि आर्या या दोघांना चिरडले. यामध्ये गंभीर जखमी होऊन सुनील आणि आर्या या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर गणेश आणि परवीन हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर कंटेनर चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.