बारामतीत कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांची तिरडी काढून निषेध ; भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

 भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे जिल्हा ग्रामीण यांच्यावतीने बारामती शहरामध्ये कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे याची तिरडी काढून आंदोलन करण्यात आले.

    बारामती: भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे जिल्हा ग्रामीण यांच्यावतीने बारामती शहरामध्ये कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे याची तिरडी काढून आंदोलन करण्यात आले.

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी आजपर्यंत काँग्रेसचे नेते वारंवार त्यांच्या विरोधात अपशब्द वापरतात, याच अनुषंगाने काल कर्नाटक मध्ये प्रियांक खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर हे वीर नव्हते, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा भाजप युवा मोर्चाने तीव्र निषेध केला आहे.

    यापूर्वी काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला आहे, काँग्रेस वारंवार सावरकरांचा अपमान करत आहे, म्हणून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने आज बारामती शहरात प्रियांक खरगे यांची तिरडी काढण्यात आली. यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीस वैभव सोलनकर, उपाध्यक्ष साकेत जगताप,स्वप्नील मोडक,ॲड ज्ञानेश्वर माने,तुषार खराडे, संदीप केसकर,अमोल इंगळे, शहराध्यक्ष सुजित वायसे,तेजस देवकाते,आकाश कांबळे, तालुकाध्यक्ष प्रकाश जगताप, पराग जाधव,नितीन शेळके, नितीन ताकवले, प्रतीक मेहत्रे, अभिजित पवार, मुकेश वाघेला आदी कार्यकर्ते उपस्थित होते.