बारामती नगरपरिषदेची आरक्षण सोडत जाहीर; ४१ पैकी २१ जागा महिलांसाठी राखीव

बारामती नगरपरिषदेच्या (Baramati Municipal Council) सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठीची आरक्षण सोडत सोमवार (दि.१३) रोजी बारामती नगरपरिषदेच्या सभागृहात जाहीर झाली. यामध्ये २० प्रभागातील ४१ जागांपैकी २१ जागा महिलांना राखीव ठेवण्यात आल्याने अनेक इच्छुकांचा 'करेक्ट कार्यक्रम' झाल्याने मोठा भ्रमनिरास झाला.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बारामती नगरपरिषदेच्या (Baramati Municipal Council) सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठीची आरक्षण सोडत सोमवार (दि.१३) रोजी बारामती नगरपरिषदेच्या सभागृहात जाहीर झाली. यामध्ये २० प्रभागातील ४१ जागांपैकी २१ जागा महिलांना राखीव ठेवण्यात आल्याने अनेक इच्छुकांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ झाल्याने मोठा भ्रमनिरास झाला.

    बारामती नगरपरिषद हद्दीतील एकूण १,०८,१५२ लोकसंख्येपैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या २० हजार ३२६ आहे. त्यानुसार अनुसूचित जातींसाठी आठ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. बारामती नगरपरिषद २०२२ च्या मुदत संपलेल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण व सोडत १३ जून रोजी नगर परिषदेच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे व मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.

    नव्याने जाहीर झालेल्या प्रभागामध्ये मोठे फेरबदल झाल्याने शहरातील अनेक दिग्गजांचा चांगलाच कस लागणार आहे. तर आरक्षण सोडत झाल्यावर गटातटाचे आपला प्रभाग सुरक्षित करण्यासाठी होणाऱ्या घडामोडी पाहण्यासाठी बारामतीकर उत्सुक आहेत.

    बारामती नगरपरिषदेचे प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे…

    प्रभाग क्र-१ – अ – अनुसूचित जाती महिला, ब – सर्वसाधारण,प्रभाग क्र-२-अ- सर्वसाधारण महिला – ब – सर्वसाधारण,प्रभाग क्र – ३-अ- सर्वसाधारण महिला,ब – सर्वसाधारण,प्रभाग क्र- ४ – अ- सर्वसाधारण महिला – ब -सर्वसाधारण

    प्रभाग क्र -५ – अ- सर्वसाधारण महिला – ब- सर्वसाधारण, प्रभाग क्र – ६ अ- सर्वसाधारण महिला,- ब- सर्वसाधारण, प्रभाग क्र – ७ – अ सर्वसाधारण महिला – ब – सर्वसाधारण,प्रभाग क्र – ८ -अ – सर्वसाधारण महिला- ब – सर्वसाधारण, प्रभाग क्र – ९ – सर्वसाधारण महिला – ब – सर्वसाधारण, प्रभाग क्र – १० – अ – सर्वसाधारण महिला – ब – सर्वसाधारण

    प्रभाग क्र- ११- अ -सर्वसाधारण महिला- ब – सर्वसाधारण, प्रभाग क्र – १२- अ – अनुसुचित जाती (महिला) ब – सर्वसाधारण, प्रभाग क्र – १३ – अनुसुचित जाती (महिला) ब – सर्वसाधारण,प्रभाग क्र – १४ – अनुसूचित जाती – ब- सर्वसाधारण (महिला)

    प्रभाग क्र – १५ – अ सर्वसाधारण (महिला) – ब – सर्वसाधारण, प्रभाग -१६ – अनुसुचित जाती – ब – सर्वसाधारण (महिला),प्रभाग -१६ अ – अनुसुचित जाती – ब – सर्वसाधारण (महिला), प्रभाग -१७ -अ- सर्वसाधारण (महिला) – ब – सर्वसाधारण,प्रभाग -१८ – अ- अनुसुचित जाती – ब – सर्वसाधारण (महिला), प्रभाग -१९ -अ-अनुसुचित जाती ( महिला ) ब – सर्वसाधारण, प्रभाग – २० – अ – अनुसुचित जाती – ब – सर्वसाधारण (महिला) – क