
बारामती शहरात सकल मराठा समाजाकडून प्रशासकीय भवनासमोर मंगळवारी (दि. ३१) आमरण उपोषण सुरु करण्यात आले.
बारामती: बारामती शहरात सकल मराठा समाजाकडून प्रशासकीय भवनासमोर मंगळवारी (दि. ३१) आमरण उपोषण सुरु करण्यात आले. ॲड विजय तावरे,अमरजित जगताप,गोविंद वाघ,धनराज रणजितसिंह नाइक निंबाळकर यांनी आज आमरण उपोषण सुरु केले.
दरम्यान,सोमवार पासुन खांडज (ता.बारामती) येथील सोमनाथ जाधव,प्रविण जाधव,साैरभ जाधव,तेजस जाधव,स्वप्नील गायकवाड,अनिकेत जाधव यांनी सोमवारपासून लाक्षणिक उपोषण सुरु केले होते.मंगळवारी विजय तावरे,अमर जगताप यांच्या हस्ते त्यांनी हे उपोषण सोडले.
मराठा क्रांती मोर्चाचे प्रशासकीय भवन येथे आमरण उपोषण सुरु आहे.यात एका बांधवाची तब्येत खालावली.त्यांना सरकारी रुग्णालयातील डाॅक्टर उपचारासाठी घेऊन गेले.त्यामुळे राज्य सरकार कधी निर्णय घेणार,अन्यथा मराठा बांधव तुमच्या बाबत कायमचा निर्णय घेइल,असा इशारा यावेळी देण्यात आला.
वकील संघटनेचा पाठींबा
मराठा क्रांती मोर्चाला बारामती वकील संघटनेने पाठींबा दर्शविला आहे.मराठा आरक्षण लढ्यात वकील संघटना समाजासोबत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.याशिवाय मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढाइ लढावी लागल्यास त्यासाठी विनाशुल्क मदत करु,अशी ग्वाही वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड उमेश काळे, अॅड स्नेहा भापकर व सहकार्यांनी दिली.