बारसू हा काही पाकव्याप्त काश्मीर नाही, ६ मे रोजी मी तिथे जाणार; उद्धव ठाकरेंचा निर्धार

मी ६ मे रोजी बारसूला जाणार आहे. बारसूतल्या लोकांशी बोलणार. तुम्ही मला रोखून दाखवा, बारसू हा काही काही पकव्याप्त काश्मीर नाही. हे लोक माझ्या नावाचं पत्र नाचवतायत. उद्धव ठाकरेंनीच ही जागा सूचवली असं पत्र दाखवतायत.

  मी ६ मे रोजी बारसूला जाणार आहे. बारसूतल्या लोकांशी बोलणार. तुम्ही मला रोखून दाखवा, बारसू हा काही काही पकव्याप्त काश्मीर नाही. हे लोक माझ्या नावाचं पत्र नाचवतायत. उद्धव ठाकरेंनीच ही जागा सूचवली असं पत्र दाखवतायत. परंतु मी त्या पत्रात कुठे लिहिलंय का तिथे पोलिसांना घुसवा, शेतकऱ्यांवर लाठ्या चालवा, गोळ्या झाडा पण रिफायनरी करा, असं पत्रात कुठे लिहिलंय, असा सवाल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

  मुंबईत आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. गेल्या महिन्याभरात महाविकास आघाडीने छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे दोन जंगी संभा घेतल्यानंतर तिन्ही पक्ष आज मुंबईत सभा घेतली. या सभेसाठी वांद्रे कुर्ला संकुलातील नरे पार्कची निवड करण्यात आली. या सभेत बोलताना ठाकरे यांनी भाजप , शिंदे फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरले.

  आपलं सरकार गेल्यानंतर या खोके सरकारने सोन्याची जागा बुलेट ट्रेनच्या घशात घातली असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर केला. बुलेट ट्रेनसाठी या लोकांनी बीकेसीतली सोन्याची जागा दिली.परंतु कुठला मुंबईतला मराठी माणसू या बुलेट ट्रेनचा वापर कराणार आहे, असे ते म्हणाले.

  उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
  येत्या ६ मे रोजी बारसूच्या दौऱ्यावर जाणार. तिथल्या लोकांशी बोलणार, त्यानंतर महाडच्या सभेला संबोधित करणार.

  चीन घुसखोरी करून आपला भूगोल बदलतोय आणि इथेले नाकर्ते राज्यकर्ते पुस्तकातला इतिहास बदलत बसलेत

  स्वत: ला हिंदूहृदयसम्राट होता येत नाही, म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न मोदींकडून सुरू

  महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर या खोके सरकारने मुंबईतली सोन्याची जागा बुलेट ट्रेनच्या घशात घातली

  सत्यपाल मलिकांनी पुलवामाबद्दल जो गौप्यस्फोट केला, त्यावर ही मंडळी (भाजपा) काय बोलणार आहे.