
शेजारच्या राष्ट्रांना इशाराही दिला आहे. भारत कुणाची खोड काढण्याचा प्रयत्न करीत नाही. मात्र कुणी जाणीवपूर्वक कोडी केली तर देश त्यांना सोडणार नाही, असंही राजनाथ सिंह म्हणाले. पंतप्रधांनांची ५६ इंचांची छाती आहे, ते जनतेला कधीही निराश करणार नाहीत, असंही त्यांनी ठासून सांगितलंय.
छत्रपती संभाजीनगर – हल्दीघाी असो वा गलवान खोरं, भारत (India) कधीही झुकला नाही, झुकणारही नाही, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी चीनला (China) खडसावलं आहे. त्यावेळी हल्दी घाटीत महाराणा प्रताप होते आता गलवान खोऱ्यात भारतीय सैन्य आहे. भारतीय सैन्यानं देशाच्या सन्मानानं नेहमीच रक्षण केलेलं आहे. असंही राजनाथ सिंह म्हणाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित वीर शिरोमणी महाराणा प्रताप महासंमलेनात ते बोलत होते.
महाराणा प्रताप, शिवरायांचं चरित्र आठवा…
महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं चरित्र आत्मसात करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या तिन्ही महापुरुषांच्या आयुष्यातून स्वाभिमानापेक्षा काहीही मोठं नाही, हेच दिसून येतं, असं राजनाथ सिंह म्हणाले.
कुणी उकसवलं तर सोडणार नाही
यावेळी त्यांनी शेजारच्या राष्ट्रांना इशाराही दिला आहे. भारत कुणाची खोड काढण्याचा प्रयत्न करीत नाही. मात्र कुणी जाणीवपूर्वक कोडी केली तर देश त्यांना सोडणार नाही, असंही राजनाथ सिंह म्हणाले. पंतप्रधांनांची ५६ इंचांची छाती आहे, ते जनतेला कधीही निराश करणार नाहीत, असंही त्यांनी ठासून सांगितलंय. उरीचा हल्ला असो वा पुलवामा हल्ला, देशाच्या सैन्यदलांनी हदशतवादाविरोधात प्रभावी कारवाया केल्याचं राजनाथ म्हणालेत. परकीय भूमीत जाऊन हल्ला करण्याची ताकद आज आपल्या सैन्यदलात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या दिल्या शुभेच्छा
छत्रपती संभाजीनगर हे नामांतर केल्याबाबत त्यांनी सगळ्यांना शुभेच्छाही दिल्यात. छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या बलिदानाची जाणीवही त्यांनी यानिमित्तानं करुन दिली. मुघलांचा काळ असा उल्लेख न करता तो महाराणा काल या नावानं ओळखला जायला हवा, असंही ते म्हणाले.