तरुणीला मारहाण करुन विनयभंग; पुण्यातील अरण्येश्वर रोडवरील घटना

तरुणील भररस्त्यात मारहाण करुन तिचा विनयभंग केल्याची घटना अरण्येश्वर रोडवर घडली आहे. याप्रकरणी दोघांवर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी सव्वा बारा ते साडेबारा या दरम्यान हा प्रकार घडला.

    पुणे : तरुणील भररस्त्यात मारहाण करुन तिचा विनयभंग केल्याची घटना अरण्येश्वर रोडवर घडली आहे. याप्रकरणी दोघांवर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी सव्वा बारा ते साडेबारा या दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी अक्षय शिंदे (रा.टांगेवाला कॉलनी, पुणे) व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी येथे राहणाऱ्या २४ वर्षाच्या तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार या त्यांच्या मैत्रिणीसोबत तुळशीबागेत एका दुकानासमोर बोलत थांबल्या होत्या. त्यावेळी अक्षय शिंदेने विनाकारण त्यांना शिवीगाळ केली. यानंतर त्या मैत्रिणीच्या दुचाकीवरून जात असताना शिंदे याने त्यांचा पाठलाग केला. सहकारनगर येथील नवजीवन मित्र मंडळाच्या येथे फिर्यादी यांच्यासोबत गैरवर्तन करून पुन्हा शिवीगाळ करुन हाताने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.