असा मुलगा नसलेला बरा!, पैसे न देणाऱ्या आईला बेदम मारहाण

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा आरोपी ईश्वर मुलगा आहे. त्याला कोकणात फिरायला जायचे होते. त्याने आईकडे पैसे मागितले. पण, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला.

    पुणे – कोकणात फिरायला जाण्यासाठी पैसे न दिल्यावरून मुलाने ६६ वर्षीय आईला बेदम मारहाण केल्याची घटना येरवडा परिसरात घडली. तर, त्यांच्या डोक्यात कोयता मारला. यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी ईश्वर प्रकाश गलांडे (वय ३८) याला अटक केली आहे. याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा आरोपी ईश्वर मुलगा आहे. त्याला कोकणात फिरायला जायचे होते. त्याने आईकडे पैसे मागितले. पण, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी त्याने आईला मारहाणकरून त्यांच्या डोक्यात कोयता मारून गंभीर जखमी केले. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.