NMMT च्या बस वाहकाला मारहाण; अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल, व्हिडिओ Viral

गुरुवारी प्रवासी व बस वाहकात तिकितावरून बाचबाची सुरू झाली. काही क्षणात या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. अज्ञात व्यक्तीने शिवीगाळ करत वाहकास मारहाण करण्यास सुरुवात झाली. बस मधील नागरिकांनी ही मारामारी सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शक्य झाले नाही.

    नवी मुंबई : नवी मुंबईत (Navi Mumbai) महापालिकेच्या (NMMT) परिवहन सेवेच्या बेलापूर ते खोपोली (Belapur To Khopoli) या ५८ नंबरच्या बस वाहकाला अज्ञात व्यक्तीने मारहाण (Beating) केली. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाले असून; मारहाण करून ही व्यक्ती पळून गेल्याचे (Run Away) या व्हिडिओत दिसून येत आहे. या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीत सूरज पाटील (Suraj Patil) हा वाहक किरकोळ जखमी (Injured) झाला आहे.

    ५८ नंबरची बस बेलापूर ते खोपोली असा प्रवास करते. गुरुवारी प्रवासी व बस वाहकात तिकितावरून बाचबाची सुरू झाली. काही क्षणात या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. अज्ञात व्यक्तीने शिवीगाळ करत वाहकास मारहाण करण्यास सुरुवात झाली. बस मधील नागरिकांनी ही मारामारी सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शक्य झाले नाही. बसमधून खाली उतरल्यावर देखील वाद सुरू होता. अखेर या इसमास नागरिकांनी थांबवून ठेवत पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांचे नाव ऐकताच हा इसम तातडीने नागरिकांना ढकलून पळून गेला. या विरोधात ३५३ अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला आहे.