ठाकरे गटाला आणखी एक धक्का? विधानपरिषदेत मनिषा कायंदेंमुळं ठाकरे गटाचं संख्याबळ कमी, अंबादास दानवेंचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात? कसे आहे पक्षीय बलाबल…

ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील संख्याबळ कमी पडल्यामुळं विरोधीपक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद हे धोक्यात येण्याची शक्यता आहे.

  मुंबई : ठाकरे गटासमोरील अडचणी काही कमी होताना नाव घेत नाहीत. उबाठा गटाला आणखी धक्का बसणार आहे. रविवारी ठाकरे गटाच्या विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाच्या (Thackeray Group) अडचणी वाढू शकतात. कारण ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील संख्याबळ कमी पडल्यामुळं विरोधीपक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद हे धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण पुरेसं संख्याबळ नसल्याकारणानं ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे..

  विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीकडून दावा?

  दरम्यान, एकीकडे अजित पवार हे विधासभेचे विरोधी पक्षनेते आहेत, म्हणजेच हे पद राष्ट्रवादीकडे आहे, त्यात आता विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीने दावा केला तर ठाकरे गटाच्या अडचणी वाढू शकतात. मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे उबाठा गटाचे सख्याबळ कमी झाले आहे. पूर्वी १० जागा उबाठाकडे होत्या, मात्र आता मनिषा कायंदेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळं ठाकरे गटाच्या आमदारांची संख्या 9 झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या देखील 9 आहे. त्यामुळं  जर राष्ट्रवादीने दावा केला तर त्यांचं पद जाऊ शकतं.

  सध्या विधानपरिषदेतील संख्याबळ

  भाजप : 22
  ठाकरे गट : 09
  शिवसेना : 02
  राष्ट्रवादी काँग्रेस : 09
  काँग्रेस : 08
  अपक्षइतर : 07
  रिक्त जागा : 21