कामावरुन परतणाऱ्या पिता-पुत्रावर मधमाश्यांच्या हल्ला; वडिलांचा जागीच मृत्यू,मुलगा गंभीर जखमी

हे दोघंही पितापुत्र मजुरीच्या कामावरुन संध्याकाळी घरी परतत असताना शिंदोल शिवारात घटना घडली आहे.

संभाजीनगर :  मजुरीचं काम आटोपून संध्याकाळी पायी घरी जाणाऱ्या पितापुत्रावर मधामाश्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पिताने जीव गमावला असुन मुलगाही गंभीररित्या जखमी झाला आहे. सोयगाव तालुक्यातील शिंदोल शिवारात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सय्यद सबदर सय्यद इस्माईल (वय 58 वर्षे) असं दुर्देवी पित्याचं  नाव असून, आबिद सय्यद सबदर जखमी मुलाचं नाव आहे.

नेमकं काय घडलं?

सय्यद सबदर सय्यद इस्माईल व त्यांचा मुलगा आबिद सय्यद सबदर या पितापुत्रांच सोयगाव तालुक्यातील शिंदोल शिवारात मजुरीचं काम सुरू होतं. नेहमीप्रमाणे ते काम आटोपुन घराच्या दिशेने निघाले. यावेळी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तेशिंदोल गावाजवळ एका अज्ञात व्यक्तीने मधमाश्यांना डिवचलने यावेळी मधमाश्यांनी तिथुन जाणाऱ्या या बापलेकावर हल्ला केला. यात सैयद सबदर सैयद इस्माईल यांच्या तोंडावर, डोक्यात आणि हातपायांवर मधमाशांनी जोरदार डंख मारले. यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर मुलगा आबीद सय्यद सबदर यालाही मधमाशांनी डंख मारून गंभीर जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेत दोघांनाही उपचारासाठी जळगाव येथे दाखल केले.  मात्र डॉक्टरांनी सय्यद सबदर यांना मृत घोषित केले. तर त्यांच्या मुलावर उपचार करण्यात येत आहे. मृत सय्यद सबदर सय्यद इस्माईल यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे. एका अज्ञात व्यक्तीच्या चुकीमुळे सय्यद सबदर यांना जीव गमवावा लागल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.