शेतकऱ्यांसोबत साजरा केला बैलपोळा, आनंदाचा सण आहे परंतु सध्या स्थिती आनंदाची नाहीये – अंबादास दानवे

सध्या स्थिती आनंदाची नाहीये. गावागावात अस्वस्थता असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.

    अंबादास दानवे : आज बैलपोळा सण आहे आणि ठिकठिकाणी बळीराजासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. असा हा सण यंदा मात्र दुष्काळाच्या सावटाखाली सापडला आहे. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महागाई वाढल्याने शेतकरी गरजेपुरतीच खरेदी करत आहेत. अशात आज बीड जिल्ह्यातील कोल्हारवाडी या गावी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बैलपोळा साजरा केला. यावेळी त्यांनी गावाच्या परंपरेनुसार बैलांचे पूजन केले. राज्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे याठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून शेतकऱ्यांसोबत हा साजरा करण्याचा निर्णय घेतला, असे अंबादास दानवे यांनी सांगितले आहे.

    विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी बीड जवळील कोल्हारवाडी येथे शेतकऱ्यांसमवेत बैलपोळा साजरा केला. अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत कोल्हारवाडी येथे बैलांची मिरवणूक काढून परंपरेनुसार पूजन करण्यात आले. पोळा हा सण आनंदाचा आहे. मात्र सध्या स्थिती आनंदाची नाहीये. गावागावात अस्वस्थता असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.