बीडमध्ये तरुणांकडून गाड्यांची तोडफोड करून दहशत माजविण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

पाटील यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

    बीड : काल रात्री ९ च्या सुमारास रात्री अचानक बीडमध्ये काही घरांवर हल्ला झाला. बीड शहरातील पिंपरगव्हाण रोड परिसरात अज्ञात तरुणांकडून गाड्यांची आणि घरांची तोडफोड करून दहशत माजविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या दोन घटनेमध्ये दोन चार चाकी आणि तीन दुचाकी वाहनांचं नुकसान झाले आहे. तर याच परिसरामध्ये राहणारे किशोर गिराम पाटील यांच्या घरावर देखील हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान ही सर्व घटना सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तर पाटील यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

    या घटनेमुळे परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे घटनेचा तपास केला जात आहे. हल्ला झालेल्या किशोर गिराम पाटील यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले, २० ते २५ च्या जमावाने हा हल्ला करण्यात आला. हे २०-२५ लोक काठ्या, लाडकी रोड हे सर्व घेऊन आले होते आणि त्यांनी माझ्या घरावर दगडफेक केली. त्याचबरोबर माझ्या दुकानाची आणि गाड्यांची सुद्धा तोडफोड केली. मी घरी नसताना ही घटना घडली, तेव्हा मला याबाबतीत माझ्या घरच्यांनी मला माहिती दिली असे किशोर पाटील यांनी सांगितले.