‘अजितदादांपूर्वी जयंत पाटलांना होती उपमुख्यमंत्रिपदाची ‘ऑफर’; साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पी. आर. पाटील यांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाल्यापासून अजित पवारांबाबतची अनेक गुपिते बाहेर येत आहे. आता जयंत पाटील यांचे विश्वासू सहकारी व राजारामबापू साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पी. आर. पाटील यांनीही एक गौप्यस्फोट केला आहे.

    सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाल्यापासून अजित पवारांबाबतची अनेक गुपिते बाहेर येत आहे. आता जयंत पाटील यांचे विश्वासू सहकारी व राजारामबापू साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पी. आर. पाटील यांनीही एक गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, अजित पवारांपूर्वी जयंत पाटील यांना भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही ऑफर दिली होती, असा दावाही पाटील यांनी केला आहे.

    दीड वर्षांपूर्वी फडणवीस यांनी जयंत पाटलांना ही ऑफर दिली होती आणि या ऑफरबाबत खुद्द जयंत पाटलांनी आपल्यासह सहकाऱ्याशी चर्चाही केली होती, असेही ते म्हणाले. पाटील पुढे म्हणाले, जयंत पाटलांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्धार करत फडणवीस यांची ऑफर धुडकावून लावली. जयंत पाटलांच्या बाबतीत सुरू असणाऱ्या अफवा असून, त्यावर कोणी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.