आधी प्रकल्पाची जागा दाखवा, मगच आंदोलन करा, आदित्य ठाकरेंना भाजपाचे आव्हान

या प्रकल्पाबाबत ठाकरे सरकारने (Thackeray Government) अडीच वर्षात काहीही प्रयत्न केले नसल्याचा पुरावा आदित्य ठाकरे स्वतःच येत्या शनिवारी तळेगावजवळ (Talegaon) आयोजित केलेल्या आंदोलनातून देणार असल्याने त्यांच्या आंदोलनाची महाराष्ट्र वाटच पाहात आहे, अशी खोचक टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhyay press conference) यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली.

    मुंबई : सध्या राज्यात वेदांत्ता प्रकल्पावरुन (Vedanta Project) राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना कोडींत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) वेदांत प्रकल्प तसेच अन्य प्रकल्पावरुन सरकारला धारेवर धरत असताना, आता भाजपाने (BJP) सुद्धा आदित्य ठाकरेंनी प्रतिआव्हान दिले आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या वेदान्ता फॉक्सकॉन प्रकल्पाविषयीच्या आक्रोशाचे पितळ येत्या शनिवारी ते स्वतःच उघडे करणार आहेत. या प्रकल्पाबाबत ठाकरे सरकारने (Thackeray Government) अडीच वर्षात काहीही प्रयत्न केले नसल्याचा पुरावा आदित्य ठाकरे स्वतःच येत्या शनिवारी तळेगावजवळ (Talegaon) आयोजित केलेल्या आंदोलनातून देणार असल्याने त्यांच्या आंदोलनाची महाराष्ट्र वाटच पाहात आहे, अशी खोचक टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhyay press conference) यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली.

    दरम्यान, आता आदित्य ठाकरे या प्रकल्पाच्या नियोजित स्थळी आंदोलन करणार असल्याच्या वावड्या शिवसेनेकडून उठविल्या जात आहेत. त्यामुळे, आधी या प्रकल्पासाठी राखून ठवलेली जागा दाखवा आणि मगच आंदोलन करा, असे आव्हानही उपाध्ये यांनी दिले. तळेगावातील भूसंपादन फॉक्सकॉनच्या नियोजित प्रकल्पासाठी नव्हे, तर एमआयडीसीच्या नियोजित टप्पा-४ प्रकल्पासाठी करण्यात आले होते. ही जमीन फॉक्सकॉन प्रकल्पासाठी असल्याचे संबंधित जमीन मालकांनाही माहीत नाही, त्यामुळे प्रकल्पाची नियोजित जागा व त्यासंबंधीच्या अधिकृत सरकारी नोंदी अगोदर ठाकरे यांनी दाखवाव्यात, असेही उपाध्ये म्हणाले.