खासदार संजय राऊत यांना बेळगाव कोर्टाकडून समन्स जारी, १ डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश

महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा पेटला आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर तसेच केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnavis government) सीमा प्रश्नासाठी काहीच करत नसल्याचा आरोप केला जात असून, शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde fadnavis government) टिका केली जात असताना, आता बेळगाव कोर्टाकडून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना समन्स जारी करण्यात आला आहे.

    मुंबई – सध्या महाराष्ट्र व कर्नाटक सामीवाद जोरात सुरु आहे. कर्नाटकचे (Karnatka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एक गाव काय? बेळगाव, कारवार, निपाणीचा एक तुकडा देखील महाराष्ट्राला देणार नाही, उलट सांगलीच्या काही गावावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केला आहे. त्यामुळं महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा पेटला आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर तसेच केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnavis government) सीमा प्रश्नासाठी काहीच करत नसल्याचा आरोप केला जात असून, शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde fadnavis government) टिका केली जात असताना, आता बेळगाव कोर्टाकडून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना समन्स जारी करण्यात आला आहे.

    दरम्यान, 2018 साली खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सीमा भागात सभा घेताना, प्रक्षोभक भाषण केले होते, तसेच इथल्या स्थानिकांना भडकविण्याचा प्रयत्न खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना केला असल्याचा ठपका बेळगाव कोर्टाने ठेवला आहे. त्यामुळं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना बेळगाव कोर्टाने समन्स पाठवला असून, चौकशीसाठी 1 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. तसेच हजर न राहिल्यास राऊतांवर अटकेची टांगती तलवार असू शकते. त्यामुळं संजय राऊत 1 डिसेंबरला हजर बेळगाव कोर्टात हजर राहणार की, नाही हे पाहावे लागेल.