लाभार्थ्यांना लवकरच बीएसयूपी अंतर्गत घरे मिळणार – महापालिका आयुक्त इंदूरानी जाखड आश्वासन

कल्याण मधील विविध समस्यांबाबत आज शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त इंदूरानी जाखड यांच्यासोबत बैठक घेतली.

    कल्याण : बीएसयुपी योजनेतील घरे लाभार्थ्यांना लवकरच मिळणार असे आश्वासन कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या आयुक्त इंदूरराणी जाखड यांनी शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांना दिला आहे.

    कल्याण मधील विविध समस्यांबाबत आज शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त इंदूरानी जाखड यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत कल्याण पश्चिम मधील कचरा, सुशिभोकरण, रस्ते, रिंगरुट, बीएसयूपी प्रकल्प बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी बीएसयुपी प्रकल्पात लाभार्थ्यांना घर देण्याबाबत दर आठवड्याला बैठक होणार असून लवकरच लाभार्थ्यांना घरं दिले जातील असे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिल्याचे रवी पाटील यांनी सांगितले. यावेळी माजी महापौर वैजयंती गुजर घोलप माजी नगरसेवक गणेश जाधव माजी नगरसेवक प्रभुनाथ भोईर नगरसेवक मोहन उगले हे उपस्थित होते.

    जनमत शिवसेना भाजप युतीच्या बाजूने –
    पाच राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले याबाबत बोलताना रवी पाटील यांनी शिवसेना-भाजपची युती आहे. भाजपचा विजय झाला याचा आम्हाला आनंद आहे. जनमत शिवसेना-भाजप युतीच्या बाजूने असल्याचे या निकालावरून स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.