लव्ह जिहादवरुन विधान भवनाच्या आवारात नितेश राणे व अबू आझमी यांच्यात ‘तु.. तु.. मै..मै’; नितेश राणेंनी आझमींना सुनावले, म्हणाले…

सभागृहात लव्ह जिहादवरुन गोंधळ झाल्यानंतर बाहेर विधान भवनाच्या आवारात आमदार समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी  व भाजपा आमदार नितेश राणे यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहयला मिळाले. या दोघांत बराच वेळ तु..तु. मै...मै सुरु होते. यावेळी या दोघांच्या भोवती पत्रकार देखील जमा झाले. त्यानंतर या दोघांमधील बाचाबाचीचा अंदाज पत्रकारांना आला.

मुंबई- सध्या शिंदे-फडणवीस सरकारचे (Shinde fadnavis government) पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) अनेक महत्वाचे निर्णय व घोषणा होत आहेत, तर दुसरीकडे विरोधक व सत्ताधारी यांच्यात आरोप प्रत्यारोपावरुन खडाजंगी होताना पाहयाल मिळत आहे. दरम्यान, लव्ह जिहादवरुन सपा नेते व आमदार आबू आझमी आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यात कलगीतुरा रंगला. आमदार मंगलप्रभात लोढा यांनी सभागृहात लव्ह जिहादच्या (love Jihad) १ लाख प्रकरण असल्याची माहिती दिली होती. या प्रकरणात लवकरच पुरावे सादर करणार असल्याच आमदार नितेश राणे यांनी आज माहिती दिली.

दोन नेत्यांमध्ये बाचाबाची…

दरम्यान, सभागृहात लव्ह जिहादवरुन गोंधळ झाल्यानंतर बाहेर विधान भवनाच्या आवारात आमदार समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी  व भाजपा आमदार नितेश राणे यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहयला मिळाले. या दोघांत बराच वेळ तु..तु. मै…मै सुरु होते. यावेळी या दोघांच्या भोवती पत्रकार देखील जमा झाले. त्यानंतर या दोघांमधील बाचाबाचीचा अंदाज पत्रकारांना आला. दरम्यान “लव्ह जिहादची प्रकरण खोटी असल्याच सांगत मुस्लीम समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू असल्याच आमदार अबू आझमी यांच म्हणणं होतं”. यावरुन नितेश राणे आक्रमक झाले आणि “पत्रकार परिषदेला या, मी तुम्हाला सर्व सविस्तर माहिती देतो, असं आझमी यांना म्हणाले.” त्यामुळं थोडावेळ वातावरण तापले होते.

विरोधकांचे आंदोलन…

आज अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी विरोधकांनी सरकारच्या विरोधात आंदोलन केले. संवेदनशील कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करा… गद्दार सत्तार हाय हाय… शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या अब्दुल सत्तार यांचा धिक्कार असो… किसानों के गद्दारोंको जुते मारो सालों को… शेतकऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… पन्नास खोके एकदम ओके… बोलाचीच कढी बोलाचिच भात जेवोनिया तृप्त कोण झाला… यंदाचा अर्थसंकल्प वाया गेला…अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.