Beware! Swine flu reaches Gondia, citizens advised to be alert

जिल्ह्यातील एका बाधितावर नागपूर येथे उपचार सुरू आहे. पावसाळा असल्यामुळे आजार पसरण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे (District Health Officer Dr. Nitin Wankhede) यांनी केले आहे.

  गोंदिया : राज्यात स्वाईन फ्लू विषाणू संसर्ग (Swine flu virus infection) वाढत असून मृत्यू देखील होत आहे. हा विषाणू नागपूरपर्यंत पोहोचला असल्याने जिल्ह्यात देखील त्याचा प्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील एका बाधितावर नागपूर येथे उपचार सुरू आहे. पावसाळा असल्यामुळे आजार पसरण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे (District Health Officer Dr. Nitin Wankhede) यांनी केले आहे.

  राज्यात इन्फल्युएंझा एच.१ एन.१ (Influenza H.1 N.1)(स्वाईन फ्लु ) च्या रुग्णामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. जानेवारी २०२२ ते २० जुलै २०२२ अखेर राज्यात या आजाराचे बाधित रुग्ण ८१ व ४ मृत्यू झालेले आहेत. मुख्यतः बृन्हमुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूर, नाशिक व नागपूर या भागात या आजाराचे प्रमाणे विशेष करून आढळत आहेत. इन्फल्युएंझा एच १ एन १ रुग्ण पावसाळयात मुख्यत्वे आढळतात, हे लक्षात घेतले तर या वर्षी आपल्या जिल्ह्यात सुद्धा पावसाचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  इन्फल्यूएंझा एच १ एन १ प्रतिबंध व नियंत्रण उपाययोजना सर्वसाधारणपणे कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेत सारख्याच आहेत. म्हणून, प्रत्येक फ्लू  सदृश्य रुग्णांचे कोविड सोबतच इन्फल्यूएंझा तपासणी देखील करणे आवश्यक आहे. गोंदिया शहरातील एक रुग़्ण २७ जुलै रोजी न्युमोनिया सद्रुष लक्षणे (Pneumonia-like symptoms ) आढळल्या नंतर त्याने दुखणे अंगावर काढले, त्याची प्रकृती जास्त खालावल्याने तो गोंदिया येथील खासगी के. एम. जे रुग्णालयात (K. M. J. Hospital) भर्ती झाला. तेथून त्याला नागपुर येथे संदर्भित केले.  तेथे त्याची इन्फल्युएंझा एच.१ एन.१ पॉझिटिव्ह आल्याने किंग्स वे रुग्णालयात भर्ती असून तो वैद्यकीय देखरेख मध्ये आहे.

  त्याच्या गोंदिया येथील घरातील सहवासितांचे व आजुबाजु परिसरातील ९५ घरांचे कुटुंबातील लोकांच्या घशातील स्त्रावाचा स्वॉब तपासणी करण्यात आले असून त्यांना कुठलेही लक्षणे नसून ते सर्व ठिक आहेत. स्वाईन फ्लू संसर्गाचा कालावधी हा १ ते ७ दिवसांचा आहे. इन्फल्युएंझा एच १ एन १ रुग्णांमध्ये लक्षणे आढळून येण्याच्या एक दिवस आधीपासून ते लक्षणे आढळल्यानंतर पुढील ७ दिवसां पर्यंत इन्पल्युएंझा एच १ एन १ चा रुग्ण निकट सहवासितांमध्ये संसर्ग संक्रमित करु शकतो. त्यामुळे, या कालावधीत इन्फल्युएंझा एच १ एन १ बाधित रुग्णांच्या प्रत्यक्ष सहवासात आलेल्या निकट सहवासितांचा शोध घेणे आवश्यक असते.

  काय असतात लक्षणे

  ताप, घसादुखी, घशाला खवखव,  खोकला,  नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी, इतर कोणतेही निदान झालेले नसणे. बालरुग्णांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाचा ताप आढळतो. घसादुखी असणाऱ्या बाळामध्ये तोंडातून अतिप्रमाणात लाळ गळताना आढळते. काही रुग्णांना जुलाब उलटया होतात. प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींमध्ये अनेक वेळा ताप आढळत नाही. तीव्र श्वसन दहन,

  टाळण्यासाठी हे करा

  वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा. पौष्टिक आहार घ्या. लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या या सारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करा. धूम्रपान टाळा. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या. भरपूर पाणी प्या.

  हे करू नका

  हस्तांदोलन, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषध घेऊ नका. आपल्याला फल्यू सदृश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. नियमित मास्क वापरा. तसेच मास्कची चुकीच्या पध्दतीने विल्हेवाट लावल्याने संसर्ग वाढण्याची भीती असते. त्यामुळे कमीतकमी सर्वसामान्य जनतेने घडीचा रुमाल वापरणे अधिक योग्य आहे.