beware there is danger ahead how convict of matchmaking abuse of law by investigating officer high court recorded opinion nrvb

लग्न जुळवून दिल्याबद्दल याचिकाकर्त्यांवरही नोव्हेंबर २०१९ मध्ये बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. वांद्रे दंडाधिकाऱ्यांसमोर आरोपपत्र दाखल झाले. बँकरची एकमेव भूमिका म्हणजे वधू आणि वधूच्या दोन्ही कुटुंबांची ओळख करून देण्याचे `माध्यम’ म्हणून काम केले, असे न्यायाधीशांनी आरोपपत्रात नमूद केले.

    मयुर फडके, मुंबई : जर महिलेने (Woman) तिच्या पती (Husband) आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध (Her Family) फसवणुकीचा गुन्हा (Crime of Fraud) दाखल केला असल्यास पोलिसांनी विवाह जुळवणाऱ्या दोषी कसे ठरवले? असा प्रश्न उपस्थित करून उच्च न्यायालयाने (High Court) विवाह जुळणी करणाऱ्याविरोधातील गुन्हा रद्द केला (Case against marriage matchmaker quashed). हे तपास अधिकाऱ्याने कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर करण्यासारखे आहे, असेही निरीक्षण न्यायालयाने आदेशात नोंदवले.

    पश्चिम बंगालमध्ये कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ बँकरसोबत तक्रारकर्त्या महिलेचे घरगुती संबंध होते. त्याच्याच सांगण्यावरून महिलेला लग्नासाठी स्थळ आले होते. त्याच व्यक्तीशी तक्रारकर्त्या महिलेचा गोव्यात हिंदू पद्धतीनुसार डेस्टिनेशन विवाह झाला आणि ते ऑस्ट्रेलियाला रवाना झाले. त्यानंतर, महिलेची शारीरिक आणि मानसिक छळवणूक सुरू झाली आणि सासरच्या मंडळींकडून दागिने, रोख रकमेची मागणी करण्यात आली, तिने त्यांच्याविरुद्ध घरगुती हिंसाचारीच्या आरोपांसह गुन्हा नोंदवण्यात आला.

    लग्न जुळवून दिल्याबद्दल याचिकाकर्त्यांवरही नोव्हेंबर २०१९ मध्ये बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. वांद्रे दंडाधिकाऱ्यांसमोर आरोपपत्र दाखल झाले. बँकरची एकमेव भूमिका म्हणजे वधू आणि वधूच्या दोन्ही कुटुंबांची ओळख करून देण्याचे `माध्यम’ म्हणून काम केले, असे न्यायाधीशांनी आरोपपत्रात नमूद केले. जानेवारी २०२१ मध्ये सत्र न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

    अर्जदाराला या गुन्ह्यात आरोपी म्हणून कसे उभे केले? याबाबत कोणीही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. याचिकाकर्त्यांवरील आरोप बिनबुडाचे आहेत आणि प्रथमदर्शनी त्यांच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल न करण्याचे आदेश दिले.

    बॅंकर तथा लग्न जुळविणाऱ्यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली. त्यावर न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यानी, सद्भावनेने, दोन्ही कुटुबियांशी संपर्क साधून विवाह जुळवून आणण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम केले. त्याचा कोणत्याही गैरकृत्याशी संबंध नाही. आश्चर्याची बाब म्हणजे याचिकाकर्त्यावर प्रथम माहिती अहवालात किंवा न्यायदंडाधिकार्‍यांसमोरील पीडितेच्या जबाबात कोणतेही आरोप नाहीत. निव्वळ पुरवणी निवेदनात, तिने याचिकाकर्त्यांनी तिच्या वडिलांचे भावनिक शोषण करून पती आणि सासरचे लोक सभ्य, सुसंस्कृत आहेत अशी स्तुती केली आणि फसवणूक केल्याचे म्हटले आहे.

    न्यायालयासमोरील पुराव्यावरून याचिकाकर्त्याने केलेल्या दखलपात्र किंवा अदखलपात्र गुन्ह्याचा खुलासा करत नाही. त्यामुळे त्यांच्यावरील आरोप मूर्खपणाचे आहेत. ज्याच्या आधारावर कोणताही विवेकी व्यक्ती कधीही योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही असेही आपल्याल आदेशात नमूद करून न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा देऊन गुन्हा रद्द केला.