फटाक्यांच्या आतिषबाजीने भगवंत महोत्सवाची सांगता; मॉर्निंग सोशल फाउंडेशनकडून महाप्रसाद

ग्रामदैवत श्री भगवंत जयंतीनिमित्त आठवडाभर सुरू असलेल्या विविध कार्यक्रमाची सांगता शोभेच्या दारूकामाच्या आतिषबाजीने झाली. शिवशक्ति बँकेच्या वतीने या आतिषबाजीचे नेटके नियोजन करण्यात आले होते. यावेळी बार्शीकरांनी भगवंत स्टेडियमवर खचाखच गर्दी केली होती.  

    बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : ग्रामदैवत श्री भगवंत जयंतीनिमित्त आठवडाभर सुरू असलेल्या विविध कार्यक्रमाची सांगता शोभेच्या दारूकामाच्या आतिषबाजीने झाली. शिवशक्ति बँकेच्या वतीने या आतिषबाजीचे नेटके नियोजन करण्यात आले होते. यावेळी बार्शीकरांनी भगवंत स्टेडियमवर खचाखच गर्दी केली होती.

    कार्यक्रमास आ. राजेंद्र राऊत, सुभाष लोढा, दिलीप बुडूख, शिवशक्ति बँकेचे चेअरमन डॉ. प्रकाश बुरगुटे, माजी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, रमेश पाटील, श्रीधर कांबळे उपस्थित होते. तर भगवंत प्रकट दिनाच्या दिवशी मॉर्निग सोशल फाऊंडेशनच्या वतीने प्रसाद म्हणुन सुमारे २५ हजार जणांना महाप्रसादाचे आयोजन केले होते.

    भगवंत देवस्थान ट्रस्ट, बार्शी नगर परिषद, आणि भगवंत महोत्सव समिती यांच्यावतीने भगवंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आठवडाभर विविध कार्यक्रमाची रेलचेल होती. शुक्रवारी मॉडेल हायस्कूलच्या प्रांगणात मॉर्निंग सोशल फाउंडेशनच्या वतीने बार्शीकरांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यासाठी मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक विजय राऊत, माजी नगरसेवक संदेश काकडे, विजय चव्हाण, पाचू उघडे, समाधान पाटील, बापू करळे, सौदागर नवगिरे, दीपक मुंडे, अनिल कोरेकर, विनोद कदम, नितीन थोरबोले, सचिन उकिरडे, संजय धारूरकर, सतीश दळवी, बाबा मुळे, शिवकुमार शिंदे, चिंतामणी अण्णा, डॉ. हरीश कुलकर्णी, अण्णासाहेब ढगे, माऊली नाळे, शीतल नाळे, दिपक खरात, राजेश डीडवळ, काका दगडे, संजय चौधरी, प्रदीप गायकवाड, प्रवीण गायकवाड, हेमंत जाधव, दिपक राऊत यांनी दिवसभर विशेष परिश्रम घेतले.

    सायंकाळी स्टेडियमवर आतिषबाजी बघण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. मैदानावरील सर्व स्टँड अक्षरशः खचाखच भरले होते. यावेळी मनमोहक, नयनरम्य आतिषबाजीने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले. याप्रसंगी राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळवणारे ‘कस्तुरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक विनोद कांबळे आणि कलाकार विजय शिखरे यांचा विशेष सत्कार आ. राजेंद्र राऊत व डॉ. प्रकाश बुरगुटे यांच्या हस्ते करण्यात आला.