bhagwat karad and sawe sleeping in meeting

चंद्रशेखर बावनकुळे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. विधान परिषद मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने भाजप शिक्षक परिषद उमेदवार प्रा. किरण पाटील यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, मंत्री अतुल सावे, संदीपान भुमरेंसह अनेक खासदार पदाधिकारी उपस्थित होते.

    मुंबई: औरंगाबादमध्ये (Aurangabad) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची एक प्रचार सभा झाली होती. मात्र बावनकुळेंच्या प्रचारसभेपेक्षा एका वेगळ्या गोष्टीची सध्या चर्चा सुरु आहे. ही चर्चा सुरु आहे त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित भाजप नेत्यांची. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे हे भाषण करत असताना भाजपच्या (BJP) मंत्र्यांपासून पदाधिकाऱ्यांपर्यंत अनेक जण व्यासपीठावर भर प्रचारसभेत ढाराढूर असल्याचे पाहायला मिळाले. अमोल मिटकरी (Amol Mitkari Tweet) यांनी हा व्हिडिओ (Video) ट्विट केला आहे.

    अमोल मिटकरी यांनी व्हिडिओ ट्विट करून लिहिले आहे की,“हे आहेत भाजप प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे !
    जे बारामतीत जाऊन घड्याळ बंद पाडणार आहेत, त्यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या कार्यक्रमाच्या स्टेजवर त्यांच्या भाषणाचा आनंद लुटताना केंद्रीय मंत्री भागवत जी कराड व माननीय मंत्री श्री अतुलजी सावे. ”

    चंद्रशेखर बावनकुळे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. विधान परिषद मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने भाजप शिक्षक परिषद उमेदवार प्रा. किरण पाटील यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, मंत्री अतुल सावे, संदीपान भुमरेंसह अनेक खासदार पदाधिकारी उपस्थित होते. त्या सभेचा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. अमोल मिटकरी यांनी ट्विट केलेल्या या व्हिडिओमुळे सध्या खूप खळबळ माजली आहे. भर सभेत नेते खरंच झोपा काढत होते का ? की यात काही एडिटींग करुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. भाजपकडून अद्याप याबाबत काहीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. याबाबत काही खुलासाही करण्यात आलेला नाही.