भरत गोगावलेंची प्रतोदपदी निवड वैध; ठाकरे गटाला मोठा धक्का; विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय

शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाचे वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर केले. यामध्ये त्यांनी प्रथम निर्णय घेतला ठाकरे गटाची घटना ही अमान्य असून, खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचं त्यांनी निकालातून स्पष्ट केले.

  मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाचे वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करीत आहेत. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे त्यांनी निकालातून स्पष्ट केले. तर शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांची निवड वैध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
  भरत गोगावले यांची नियुक्ती योग्य
  निकाल वाचनावेळी नार्वेकर म्हणाले, २१ जून २०२२ रोजी विधीमंडळ सचिवालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शिंदे गटाकडे बहुमत दिसत आहे. त्यामुळे शिंदे गट हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचे स्पष्ट होतं आहे. ”भरत गोगावले यांची नियुक्ती योग्य आहे. २१ आणि २३ जून २०२२ रोजीचे शिंदे गटाची पत्रे विधिमंडळ सचिवालयात आहेत. या दिवशी शिंदे गट हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचे झाले. एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी झालेली नियुक्तीही वैध आहे” असे नार्वेकरांनी स्पष्ट सांगितले.
  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर
  आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचे वाचन १० जानेवारी २०२४ रोजी दुपारी ४.३० मिनिटांनी सुरुवात होईल, असं सांगण्यात आले होते. मात्र, या अपेक्षित वेळेपेक्षा ४५ मनिटे उशिरा नार्वेकर सेन्ट्रल हॉलमध्ये दाखल झाले. त्यानंतर एक तासाहून अधिक काळ निकाल वाचल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर केला.
  शिंद गट हाच खरा शिवसेना पक्ष
  दरम्यान, शिंद गट हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचे नार्वेकरांनी निकालामध्ये सांगितले. त्याला पुष्टी देताना म्हटले की, शिवसेनेची २०१८ ची घटनादुरुस्ती मान्य करता येत नाही. ती नियमांना धरून नाही. राष्ट्रीय कार्यकारिणीचे मत महत्त्वाचे होते. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून पक्षाची मूळ घटना आम्ही मागवून घेतली. त्यामधील तरतुदीनुसार एकनाथ शिंदेंचा गट मूळ पक्ष ठरत आहे.
  नार्वेकरांच्या निकालातील ठळक मुद्दे…
  संपर्काच्या बाहेर गेले, केवळ याच कारणास्तव आमदारांना अपात्र ठरविता येणार नाही. ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक यांनी सुरतेत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली हेही सिद्ध झाले. सत्तांतराच्या काळात खरा पक्ष हा शिंदेंचा हे सिद्ध झाल्याने २१ जून २०२२ च्या शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतील गैरहजरीच्या मुद्दयावर अपात्रता ठरविता येणार नाही.
  विधीमंडळ अधिवेशनास अनुपस्थिती
  बैठकीला अनुपस्थित राहणे हे अपात्रतेचे कारण ठरू शकत नाही. विधीमंडळ अधिवेशनास अनुपस्थिती हे कारण अपात्रतेचे कारण ठरु शकते. २१ जून २०२१च्या बैठकीच्या हजेरीपत्रकाची मुळ प्रत व सादर केलेली प्रत यांमधील तफावत; यांमुळे हा पुरावा ग्राह्य धरता येणार नाही