file photo
file photo

जिल्ह्यातील हिवरा फाटा/चोरंबा फाटा येथे यात्रेेचं आगमन होईल. त्यानंतर ही यात्रा वारंगा फाटा येथे येणार आहे.

    हिंगोली :  नांदेड नंतर आता काँग्रेसची भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रा हिंगोलीच्या दिशेनं जाणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आज सांयकाळी ४.३० वाजता जिल्ह्यातील हिवरा फाटा/चोरंबा फाटा येथे ही यात्रा दाखल होणार आहे. हिंगोली काँग्रेसतर्फे मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे. शहरात अनेक ठिकाणी यात्रेच्या स्वागताची तयारी करण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरातून काँग्रेसचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधीही शहरात दाखल झाले आहेत. ही यात्रा जिल्ह्यात चार दिवस राहणार आहे.
    हिगोंलीत चार दिवस मुक्काम केल्यानंतर ही यात्रा वाशीम, अकोला, बुलडाणा जिल्ह्यातून मध्यप्रदेशात जाणार आहे.

     

    जिल्ह्यातील हिवरा फाटा/चोरंबा फाटा येथे यात्रेेचं आगमन होईल. त्यानंतर ही यात्रा वारंगा फाटा येथे  येणार आहे. येथे राहुल गांधी यांची कॉर्नर सभा आयोजीत करण्यात आली आहे. त्या नंतर रात्री दाती पाटीजवळ मुक्काम होणार आहे.  मंगळवारी (ता. १५) वडद फाटा येथून पदयात्रेचा वाशीमच्या दिशेनं जाणार आहे.

    काल नांदेड मधील नवा मोंढा येथे राहुल गांधींची सभा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी राज्याबाहेर जात असलेल्याच्या प्रकल्पावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला. याशिवाय, मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातून मोठे प्रकल्प बाहेर राज्यात जात असल्यावरूनही राहुल गांधी यांनी “जसे महाराष्ट्रातू मोठे प्रकल्प गायब होताय, फॉक्सकॉनचा प्रक्लप गेला. एअरबसचा प्रकल्प गेला, तसेच १५ लाखही गायब झाले.” असं म्हणत राहुल गांधी यांनी टीका केली.