साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अखिल भारतीय मातंग संघाने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    Anna Bhau Sathe : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा मरणोत्तर गौरव करावा अशी मागणी अखिल भारतीय मातंग संघाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. भारतरत्न पुरस्काराची शिफारस मुख्यमंत्री शिंधे यांनी केंद्र सरकारकडे राज्य सरकारच्या वतीने करण्यात यावी याकडे अखिल भारतीय मातंग संघाने लक्ष वेधले आहे.

    साहित्यरत्न साठे यांनी त्यांच्या साहित्य लेखानातून वास्तववादी नायक उभे केले. समाजाचे खरे चित्र मांडले. साठे यांनी ३५ कांदबऱ््या, ११ कथासंग्रह, १३ लोकनाट्ये, ३ नाटके, ७ चित्रपटाच्या कथा, रशिया प्रवास वर्णन लिहिले आहे. याशिवाय गिरणी कामगारांच्या लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रीय सहभाग घेतला. पोवाडे आणि लेखनातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी केली. त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात यावे. त्याचबरोबर त्यांच्या जयंती १ आ’गस्ट रोजी असते. त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात यावी. याशिवाय क्रांतीवीर लहूजी वस्ताद यांची जयंती १४ नोव्हेंबर रोजी असते. या दिवशीही सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय मातंग संघाचे शाखाध्यक्ष संतोष नाडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.