Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrations kick off Commencement of various programs in the presence of MLA Bhusar

महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती महोत्सवाची विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत उद्घाटन करण्यात आले. मागील १५ वर्षात जे काम झाले नाही ते या वर्षी या प्रभागात नगरसेवकांनी  केले असे बोलून नगरसेवकांना कौतुकाची थाप दिली, स्मारथा साळवे या एक ४ वर्ष्याच्या बलिकेचा जन्मदिन असल्याचे आमदार भुसारांच्या लक्ष्यात येताच तिला जन्मदिनी शुभेच्छा देखील दिल्या(Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrations kick off; Commencement of various programs in the presence of MLA Bhusar).

  जव्हार: महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती महोत्सवाची विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत उद्घाटन करण्यात आले. मागील १५ वर्षात जे काम झाले नाही ते या वर्षी या प्रभागात नगरसेवकांनी  केले असे बोलून नगरसेवकांना कौतुकाची थाप दिली, स्मारथा साळवे या एक ४ वर्ष्याच्या बलिकेचा जन्मदिन असल्याचे आमदार भुसारांच्या लक्ष्यात येताच तिला जन्मदिनी शुभेच्छा देखील दिल्या(Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrations kick off; Commencement of various programs in the presence of MLA Bhusar).

  मागील 2 वर्षी कोरोना महामारीने प्रशासनाने निर्बंध लादले असल्याने कोणताच सार्वजनिक कार्यक्रम झाला नव्हता परंतु यंदा राज्य सरकारने सर्व निर्बंध शिथिल केले असल्याने विविध स्पर्धा व भरगच्च कार्यकाने भीम जयंती साजरी करण्यात येणार आहे.

  जव्हार नगर परिषदेच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीतर्फे सुगरण कौशल्य, मेणबत्ती पेटवणे, चमचा लिंबू, बास्केटबॉल, दोरी उडी, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा या स्पर्धा विशेष करुन महिलांसाठी आयोजित करण्यात आल्या असून लहान मुलांसाठी व खुल्या गटासाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा त्याचप्रमाणे राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, बौद्ध धम्म दीक्षा समारंभ, गायन कार्यक्रम, वक्त्यांचे व्याख्यान अशा भरगच्च कार्यक्रमातून यंदाच्या वर्षी ची भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येणार आहे.

  जव्हार शहरात नगरपरिषदेकडून दीड लाख रुपये खर्च करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येते,या वर्षी 4 दिवसांचा भरगच्च कार्यक्रम करणार असल्याचे उत्सव समिती अध्यक्ष पप्पू सावंत आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते  राजेश धात्रक, नितांत कांबळे, विश्वास भरीत, गोविंद बल्लाळ, सागर बल्लाळ, प्रशांत तेजे यांनी बोलताना सांगितले आहे.

  शिवाय पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष निलेश सांबरे देखील आपली उपस्थिती नोंदवणार आहेत,शिवाय अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

  शहरातील सर्वच प्रभागातील नगरसेवक, नगरसेविका, गट नेते, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष, नगर परिषद मुख्याधिकारी, अधिकारी व कर्मचारी, आंबेकडर अनुयायी उपस्थित राहून कार्यक्रम भव्यदिव्य प्रमाणात साजरा होणार असल्याचे महिला बालकल्याण समिती सभापती, स्थानिक नगरसेविका विशाखा साळवे यांनी बोलताना सांगितले आहे.