भारतीय जनता पार्टी सातारा लोकसभा निवडणूक समन्वयपदी सूर्यकांत पडवळ

सातारा लोकसभा निवडणूक २०२४ या निवडणुकीसाठी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयक पदी कराड उत्तर मधील सूर्यकांत पडवळ यांची निवड करण्यात आली आहे. रामकृष्ण वेताळ यांच्या सहकार्याने कराड उत्तर मध्ये केलेल्या संघटनेच्या कामामुळे त्यांची या पदावर वर्णी लागली आहे. त्यांना भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी नियुक्तीचे पत्र प्रदान केले आहे.

    ओगलेवाडी : सातारा लोकसभा निवडणूक २०२४ या निवडणुकीसाठी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयक पदी कराड उत्तर मधील सूर्यकांत पडवळ यांची निवड करण्यात आली आहे. रामकृष्ण वेताळ यांच्या सहकार्याने कराड उत्तर मध्ये केलेल्या संघटनेच्या कामामुळे त्यांची या पदावर वर्णी लागली आहे. त्यांना भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी नियुक्तीचे पत्र प्रदान केले आहे.

    लोकसभा २०२४ या निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा मतदारसंघात भाजपाची जोरदार तयारी सुरू आहे. संघटन कौशल्य असलेल्या अनेकांची वर्णी विविध पदावर लावली जात आहे. कोणत्याही परिस्थितीत सातारा मतदारसंघ जिंकायचा हा निश्चय भाजपाने केला आहे.त्यामुळेच मरळी गावचे सूर्यकांत पडवळ यांची समन्वयक पदी नेमणूक केली आहे.

    रामकृष्ण वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या मतदारसंघांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामगिरीचे मूल्यमापन करूनच त्यांना समन्वयक पदी बढती मिळाली आहे.या निवडीबद्दल त्यांचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज आ. जयकुमार गोरे, आ. शिवेंद्रसिंह राजे भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, श्री. लोकसभा प्रभारी अतुल भोसले, भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, कराड उत्तर नेते मनोज घोरपडे,, माजी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी भरत पाटील यांनी अभिनंदन केले.