भास्कर जाधव यांना पोलिसांकडून नोटीस, नारायण राणेंविरोधात अपमानकारक केलं होतं वक्तव्य

उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संपत्ती संदर्भात विवरण आणि तपासाला सहकार्य करण्यासाठी नोटीस बजावली होती. या विरोधात भास्कर जाधव यांनी भाजपला लक्ष करत वक्तव्य केलं होत.

    कुडाळमधील एका मोर्च्यात आमदार भास्कर जाधव यांनी (Bhaskar Jadhav)चिथावणीखोर वक्तव्यं केल्याप्रकरणी भाजपनं तक्रार केली होती. या प्रकरणी आता कुडाळ पोलिसांनी कारवाई करत त्यांना नोटीस बजावली आहे. भास्कर जाधव यांनी कुडाळमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याविरोधात अपमानकारक आणि चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं.

    उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संपत्ती संदर्भात विवरण आणि तपासाला सहकार्य करण्यासाठी नोटीस बजावली होती. या विरोधात भास्कर जाधव यांनी भाजपला लक्ष करत वक्तव्य केलं होत. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल अपमानकारक आणि चिथावणी देणारी वक्तव्ये केलं होता. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर, याप्रकरणी भाजपने तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी आता कुडाळ पोलिसांनी त्यांच्य अटकेसंदर्भातील नोटीस बजावली आहे.