बापाच्या नावाच्या जागी बाळासाहेबांचे नाव लावा, शिंदे गटाला भास्कर जाधवांचे आव्हान

महात्मा गांधी चौकात शिवसेनेच्या वतीने मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, शिवसेना नेत्या ज्योती ठाकरे, माजी खासदार सुभाष वानखेडे, जिल्हा प्रमुख विनायक भिसे, संदेश देशमुख, डॉ. संतोष टारफे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

    हिंगोली – शिवसेनेशी गद्दारी केल्यानंतरही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करणाऱ्या गद्दारांनी त्यांच्या बापाच्या नावाच्या जागेवर बाळासाहेबांचे नाव लावावे असे आव्हान शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटाला सोमवारी (ता. १२) हिंगोली येथे दिले.

    महात्मा गांधी चौकात शिवसेनेच्या वतीने मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, शिवसेना नेत्या ज्योती ठाकरे, माजी खासदार सुभाष वानखेडे, जिल्हा प्रमुख विनायक भिसे, संदेश देशमुख, डॉ. संतोष टारफे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

    जाधव म्हणाले की, चाळीस गद्दारांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्‍वासघात केला. शिवसेनेसोबत गद्दारी केली. त्यानंतरही त्यांच्याकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नावाचा वापर केला जात आहे. शिवसेना पक्ष प्रमुख ठाकरे यांनी याबाबत विचारणा केली, तर भाजपाच्या काही चाणाक्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचेही नेते होते सांगितले.