भास्कर जाधवांचा संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांना इशारा; निवडणूक जवळ आली…

शिवसेना पक्ष फुटल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार एकनाथ शिंदेंना पक्ष आणि चिन्ह देण्यात आले. त्यानंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश केला.

    शिवसेना पक्ष फुटल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार एकनाथ शिंदेंना पक्ष आणि चिन्ह देण्यात आले. त्यानंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश केला. मात्र शिवसेनेचे काही नेते अजूनही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत.या नेत्यांमधील महत्वाचे नाव म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव. हे अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली नाही. मात्र मागील काही दिवसांपासून भास्कर जाधव यांचे नाव चर्चेत आहेत.

    गेल्या चार दिवसांमध्ये माझे नाव सतत चर्चेत आहे. सगळीकडे चुकीच्या चर्चा सुरु आहेत. पक्षाने मला नेता केलं असून मी फक्त नावापुरता नेता नाही, असे भास्कर जाधव म्हणाले. भास्कर जाधव यांनी सगळीकडे भूमिका मांडताना सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणत असाल तर मी इथेच बसतो, मी फक्त निवडणुकीसाठी येतो असं काही नाही. कोरोना काळात केलेले काम वाया जाणार आहे. सुसंस्कृत आणि स्वच्छ पार्टी म्हणून मिरवणाऱ्या भाजपने गुहागरमध्ये माझ्याबद्दल काय भाषा वापरली? असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. गुहागरमध्ये जास्त प्रचाराची गरज नाही, निवडणुकीच्या राजकारणात मी पणा चालत नाही, नम्रपणा असावा लागतो. गुहागरमधून सत्तर टक्के मतदान अनंत गीते यांना मिळालेलं असेल, असे भास्कर जाधव म्हणाले.

    पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले, ती भाषा आठवा हा भाजपचा उमेदवार आहे. म्हणून प्रचार करा. ही निवडणूक देश वाचवण्याची आहे, देश वाचवण्याची आणि पक्ष चोरणाऱ्या चोरांना जेलमध्ये टाकण्याची आहे, असे भास्कर जाधव म्हणाले. भाजपचे चोर खोटं सांगत आहेत. भास्कर जाधवांनी आम्हाला पाठवलं असा खोटा प्रचार सगळीकडे सुरु आहे. आगामी लोकसभा निवडणूक हल्ल्यात घेऊ नका, असे देखील भास्कर जाधव म्हणाले. निवडणूक जवळ आली तरी डेमो मशिन्स बाहेर नाहीत, असे भास्कर जाधव म्हणाले.