ई-सिगारेट,पानगुटख्यापासून तरुण पिढीला वाचविण्याबाबत भीम आर्मीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आपल्या पत्रात भीम आर्मीने म्हटलंय की, सिगारेट ओढणे आरोग्यास अपायकारक आहे. यामुळे तुम्हाला कर्करोगासारखा गंभीर आजार होऊ शकतो. सिगारेटच्या प्रत्येक पाकिटावर असलेली धोक्याची सूचना वाचूनही सिगारेट ओढणारे महाभाग आपण पाहतच असतो. या सिगारेट ओढणाऱ्या लोकांपासून इतरांना सुध्दा आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

    मुंबई : राज्यातील विशेषतः मुंबईसारख्या (Mumbai) देशाच्या  आर्थिक राजधानीत ई-सिगारेट, (E-cigarettes) पानगुटखा (Pangutkha) आदी व्यसनामुळं तरूण (young) पिढी बरबाद होत चाललेली आहे. याबाबत भीम आर्मीने (Bhim Army) मुख्यमंत्र्यांना (CM) पत्र (Letter) लिहिले असून, यावर आळा घालण्याची किंवा कायमस्वरुपी बंदी (ban) घालण्याची मागणी भीम आर्मीने केली आहे. आपल्या पत्रात भीम आर्मीने म्हटलंय की, सिगारेट ओढणे आरोग्यास अपायकारक आहे. यामुळे तुम्हाला कर्करोगासारखा गंभीर आजार होऊ शकतो. सिगारेटच्या प्रत्येक पाकिटावर असलेली धोक्याची सूचना वाचूनही सिगारेट ओढणारे महाभाग आपण पाहतच असतो. या सिगारेट ओढणाऱ्या लोकांपासून इतरांना सुध्दा आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. शासनाने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी घातली आहे. काही ठिकाणी स्मोकींग झोन निर्माण करण्यात आले आहे. दुर्दैवाने या सिगारेटची जागा आता” ई-सिगारेटने” घेतली. वेब सिगरेट नाव नवीन नसले तरी अनेक शाळांमध्ये व महाविद्यालयीन परीसरात या वेबची लाट आली आहे. ७५० रुपया पासून ५ हजार रुपयापर्यंत किंमत असलेली ही वेब सिगारेट मुंबईतील बहुतेक  शाळा व महाविद्यालया जवळच्या पानटपरीवर किंवा विशिष्ट  ठिकाणी मिळते. असं पत्रात म्हटलं आहे.

    दरम्यान,  द्रव्यरूपातील निकोटिनची विद्युत उपकरणाच्या माध्यमातून वाफ बनवली जाते आणि याचा धूम्रपानासाठी वापर केला जातो याला ई धूम्रपान असे म्हटले जाते. यामध्ये ई सिगारेट, फ्लेवर हुक्का, ई शिशा इत्यादी निकोटिनयुक्त उपकरणांचा समावेश आहे.शरीराला अपायकारक असलेली ही द्रवे आपल्या  तरुणपिढीची शरीर व मने खोकली करत आहे व त्याबरोबर आपल्या देशातील तरुण पिढी बरबाद होत आहे. या वेबचा धूर वेळीच रोखला नाही तर भविष्यात शाळा महाविद्यालये ही वेबचा अड्डा बनतील. शासकीय परीपत्रकानुसार शाळा व महाविद्यालयीन परीसरात तसेच आसपासच्या परिसरात असलेले तंबाखूजन्य पदार्थ व अल्कोहोल विक्रीची दुकाने पानपट्टीचे अड्डे तसेच पानमसाला गुटखे व ईसिगारेटचे रॅकेट उध्वस्त करून त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी लागेल . माननीय मुख्यमंत्री   महोदय  आपण या प्रकरणात गंभीरपणे  लक्ष केंद्रित करून योग्य ती कार्यवाही करावी ही नम्र विनंती. अशी मागणी भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे (Ashok Kamble) यांनी केली आहे.