भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण: दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक हनी बाबू यांचा जामीन फेटाळला

भीमा कोरेगाव हिंसाचार तसेच एल्गार परिषद प्रकरणी प्राध्यापक हनी बाबू यांना जुलै २०२० मध्ये त्यांच्या दिल्लीतील रहात्या घरातून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तळोजा कारागृहात आहेत. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए न्यायालयाने (Special NIA Court) फेब्रुवारी महिन्यात जामीन अर्ज फेटाळला होता.

    मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणी (Bhima Koregaon violence and Elgar Parishad case) अटकेत असलेल्या दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक हनी बाबू (५५) (Professor Honey Babu of Delhi University) यांचा जामीन अर्ज सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) फेटाळून लावला.

    भीमा कोरेगाव हिंसाचार तसेच एल्गार परिषद प्रकरणी प्राध्यापक हनी बाबू यांना जुलै २०२० मध्ये त्यांच्या दिल्लीतील रहात्या घरातून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तळोजा कारागृहात आहेत. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए न्यायालयाने (Special NIA Court) फेब्रुवारी महिन्यात जामीन अर्ज फेटाळला होता.

    सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बाबू यांच्यावतीने अ‍ॅड.युग चौधरी यांच्यामार्फत जुलै महिन्यात उच्च न्यायालयात अपील दाखल करून जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर न्या. नितिन जामदार आणि न्या. एन.एम. बोरकर यांच्या खंडपीठसमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, नक्षलवादाला चालना देण्यामध्ये सक्रियपणे सहभाग होता.

    तसेच सरकार उलथून टाकून भारताविरोधात युद्ध पुकारण्याच्या कटातही सामील होते, असा दावा करत एनआयएने हनी बाबू यांच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने आपला राखून ठेवलेला निकाल सोमवारी जाहीर केला आणि हनी बाबूंना कोणताही दिलासा देण्यास नकार देत जामीन अर्ज फेटाळून लावला.