वेताळ बांबर्डेमध्ये २७ लाखांच्या कामांचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

श्री वेतोबा मंदिराजवळ पेव्हर ब्लॉक, आंगणेवाडी वाघभाटले रस्ता आणि श्री राममंदिर तेलीवाडी रस्त्याचा समावेश.

    आमदार वैभव नाईक यांनी वेताळ बांबर्डे गावात श्री वेतोबा मंदिराजवळ पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी १० लाख रु. श्री राममंदिर तेलीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरणासाठी १० लाख रु., वेताळ बांबर्डे आंगणेवाडी मार्ग वाघभाटले रस्ता खडीकरण डांबरीकरणासाठी ७ लाख रु. अशी एकूण २७ लाखाची कामे नव्याने मंजूर केली आहेत. या कामांचा भूमिपूजन सोहळा शनिवारी ०९ मार्च रोजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. ही कामे मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.

    याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, देवस्थान कमिटी अध्यक्ष आप्पा गावडे, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, माजी जि. प. गटनेते नागेंद्र परब, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, महिला तालुकाप्रमुख स्नेहा दळवी, वेताळ बांबर्डे सरपंच वेदिका दळवी, उपसरपंच प्रदीप गावडे, बाबुराव देऊलकर, माजी पंचायत समिती सदस्य आनंद भोगले, राजू गवंडे, बाळा भोसले, ग्रा. सदस्य सुदिव्या सामंत, माजी सरपंच दिलीप तिवरेकर, प्रताप पाटकर, बाळा गावडे, सतीश बांबर्डेकर, आनंद सामंत, योगेश ठाकुर, संतोष कदम, निलेश गवाणकर, विलास सामंत, बाळा म्हापणकर, नाना मेस्त्री, यतीन सामंत, अशोक गोडकर, रमण गावडे, चंद्रकांत गावडे, दिलीप गावडे, रवी घाडी, सचिन तिवरेकर, बाळा राजाध्यक्ष, राजू बांबर्डेकर, सागर पाटकर, शुभम पाटकर, जयवंत गावडे, सुंदर पाटकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.