इंदापूरात भुजबळांच्या बॅनरवर ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख ; उद्या होणार भव्य मेळावा

ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार मेळावा उद्या (दि.९) इंदापूर प्रशासकीय इमारतीच्या शेजारील मैदानावर होतं आहे. परंतू, याच मैदानावर ओबीसींचे भावी मुख्यमंत्री म्हणून छगन भुजबळ यांचा बॅनर लावण्यात आल्याने एकच चर्चा आहे.

    इंदापूर : ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार मेळावा उद्या (दि.९) इंदापूर प्रशासकीय इमारतीच्या शेजारील मैदानावर होतं आहे. परंतू, याच मैदानावर ओबीसींचे भावी मुख्यमंत्री म्हणून छगन भुजबळ यांचा बॅनर लावण्यात आल्याने एकच चर्चा आहे.

    पश्चिम महाराष्ट्रात होणाऱ्या या पहिल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतानाच ओबीसी योद्धा, ओबीसींचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर मेळाव्याच्या ठिकाणी झळकू लागल्याने सर्वत्र चर्चेचा विषय आहे.

    ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्या करिता रासपचे नेते महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे,शब्बीर अन्सारी, भटक्या विमुक्तांचे नेते लक्ष्मण गायकवाड, प्रा.टी.पी मुंडे,कल्याण दळे,डॉ.बबनराव तायवडे असे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याकरिता मोठ्या संख्येने ओबीसी व भटके विमुक्त प्रवर्गातील बांधव येणार असल्याने पोलीस प्रसासनाकडून मोठा फौज फाटा तैनात करण्यात येणार आहे.