
दोन ग्रामपंचायत निवडणुकीत व दोन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका किरकोळ अपवाद वगळता खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. काल (दि. ६) या निवडणुकांची मतमोजणी तहसील कार्यालयात पार पडली निवडणूक निकालात भुजबळ समर्थकांनी बाजी मारल्याने येवला मतदारसंघावर छगन भुजबळ यांचे वर्चस्व कायम असल्याचे सिद्ध झाले.
येवला : तालुक्यातील दोन ग्रामपंचायत निवडणुकीत व दोन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका किरकोळ अपवाद वगळता खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. काल (दि. ६) या निवडणुकांची मतमोजणी तहसील कार्यालयात पार पडली निवडणूक निकालात भुजबळ समर्थकांनी बाजी मारल्याने येवला मतदारसंघावर छगन भुजबळ यांचे वर्चस्व कायम असल्याचे सिद्ध झाले.
येवला तालुक्यात जनतेतून सरपंच निवडणुकीत झालेल्या दोन्ही ग्रामपंचायत सरपंचपदी भुजबळ समर्थकांची वर्णी लागली आहे. शिरसगाव लौकी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सर्वसाधारण जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, लौकि शिरस ग्रामपंचायत सरपंचपदी सर्वसाधारण जागेवर प्रदीप कानडे तर खैरगव्हाण ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत समाधान सावंत देविदास पिंगट हे भुजबळ समर्थक विजयी झाले आहेत. लौकी शिरस ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी प्रदीप रमेश कानडे विजयी झाले. प्रभाग क्रमांक १ मधून नागरिकांच्या मागास प्रवर्गातून संजय मालजी कानडे सर्वसाधारण स्री जागेवर जिजाबाई दिलीप जोशी, सुरेखाबाई कन्हियालाल कानडे यांची निवड झाली आहे.
सर्वसाधारण जागेवर बापू जगन्नाथ आढाव, अनुसूचित जाती स्री प्रवर्गातून सुमनबाई सुकदेव आढंगळे, सर्वसाधारण पुरुष जागेवर सोमनाथ दगू कानडे, सर्वसाधारण स्री जागेवर प्रतिभा दत्तू शिल्लक हे विजयी झाले आहेत. जऊळके ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक १ च्या झालेल्या पोटनिवडणुकीत अनुसूचित जाती स्री प्रवर्गातून सिंधूबाई कारभारी खैरनार या विजयी झाल्या आहेत तर सर्वांचे लक्ष लागून असलेल्या खैरगव्हाण तांदुळवाडी ग्रुप ग्रामपंचायतच्या प्रभाग क्र. २ च्या पोटनिवडणुकीत सर्वसाधारण जागेवर देविदास निवृत्ती पिंगट व समाधान रामदास सावंत यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे.
शिरसगाव लौकी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष भुजबळ समर्थक ज्ञानेश्वर रामदास शेवाळे हे सरपंचपदी निवडून आले आहेत; तर प्रभाग १ मधून अनुसूचित जाती प्रवर्गातून सतीश भिमाजी पाटील, नागरिकांच्या मागास प्रवर्गातून स्री राखीवमधून सरला बाळू बुल्हे सर्वसाधारण स्री प्रवर्गातून प्रियंका गोरख मुळे विजयी झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक २ मधून सर्वसाधारण जागेवरून गोरख किसन आजगे व संतोष महिफत आजगे विजयी झाले असून, सर्वसाधारण स्री जागेवर राणी निलेश कानडे यांची बिनविरोध निवड झाली आहे प्रभाग ३ मधून नागरिकांच्या मागास प्रवर्गातून प्रवीण गोरखनाथ बुल्हे विजयी झाले आहेत. सर्वसाधारण स्री जागेवर माधुरी दत्तू वाघचौरे व अनुसूचित जमाती स्री जागेवरून संगीता विष्णू गवळी यांची बिनविरोध झाली आहे.