एमटी आयटीएफ एस 400 वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भूषण अकुत, एजस छटवाल, नरेंदर जनवेजा यांना दुहेरी मुकुट

  पुणे : आयटीएफ, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या व आर्यन पंप्स यांनी प्रायोजित केलेल्या एमटी आयटीएफ एस 400 (गुण) वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भूषण अकुत, एजस छटवाल, नरेंदर जनवेजा यांनी एकेरी व दुहेरी गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, नागराज  रेवणसिद्दैया याने विजेतेपद पटकावले.

  पराभव करून विजेतेपद पटकावले

  डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत 60 वर्षांवरील एकेरी गटात अंतिम फेरीत पाचव्या मानांकित नागराज रेवणसिद्दैयाने चौथ्या मानांकित संजय कुमारचा 6-1, 3-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

  पुरुष 55 वर्षांवरील दुहेरी गटात अंतिम लढतीत

  पुरुष 55 वर्षांवरील दुहेरी गटात अंतिम लढतीत भूषण अकुत व जितेंद्र प्रधान या दुसऱ्या मानांकित जोडीने तिसऱ्या मानांकित आलोक भटनागर व आशिष सेनचा 6-0, 6-2 असा सहज पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. काल एकेरीत याच गटात भूषण अकुतने विजेतेपद पटकावले होते.

  पुरुष 60 वर्षावरील दुहेरीत अंतिम सामना

  पुरुष 60 वर्षावरील दुहेरीत अंतिम लढतीत चेतन देसाई व मयूर वसंत माणिक यांनी रवीन चौधरी व पवन जैन या अव्वल मानांकित 6-1, 6-2 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 70 वर्षांवरील दुहेरीत अंतिम लढतीत अमेरिकेच्या एजस छटवालने नरेंद्र जनवेजाच्या साथीत अजित पेंढारकर व राजेंद्रसिंग राठोड यांचा 7-5, 6-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आर्यन पंप्सचे सुभाष सुतार, स्पर्धा संचालक रामा राव डोसा, सुपरवायझर अमित देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.

  स्पर्धेचा सविस्तर निकाल: 60 वर्षांवरील एकेरी गट : अंतिम फेरी: नागराज रेवणसिद्दैया(भारत)[5] वि.वि.संजय कुमार( भारत) [4] 6-1, 3-0

  पुरुष 55 वर्षांवरील दुहेरी गट : अंतिम फेरी: भूषण अकुत(भारत) [2] / जितेंद्र प्रधान(भारत)वि.वि.आलोक भटनागर(भारत)/आशिष सेन(भारत)[3] 6-0, 6-2;
  पुरुष 60 वर्षावरील दुहेरी गट : अंतिम फेरी: चेतन देसाई(भारत)/मयूर वसंत माणिक(भारत)वि.वि.रवीन चौधरी(भारत)/पवन जैन(भारत)[1] 6-1, 6-2.

  70 वर्षांवरील दुहेरी गट : अंतिम फेरी : एजस छटवाल(अमेरिका)/नरेंद्र जनवेजा(भारत)वि.वि.अजित पेंढारकर( भारत)/राजेंद्रसिंग राठोड( भारत) 7-5, 6-4.