ससून रुग्णालयातील ड्रग्जप्रकरणी मोठी कारवाई; मोठ्या अधिकाऱ्यांसह 9 पोलीस निलंबित, पाहा सविस्तर

    पुणे : ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला आरोपी ललित अनिल पाटील (वय ३४) याने पोलिसांना चकवा देऊन पलायन केले होते. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी हलगर्जी करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली असून, एका अधिकाऱ्यासह तब्बल 9 जणांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.

    ललित पाटील ड्रग्स विक्रीप्रकरणी ४ कर्मचारी आणि महिला अधिकाऱ्यांसह 5 जणांचे निलंबन करण्यात आले. ललित पाटील हा ड्रग्स तस्करीप्रकरणातील कुख्यात आरोपी होता. काल संध्याकाळी ६ वाजता ललित हा ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून गेला होता.

    याप्रकरणी आता पुणे पोलीस आयुक्तांनी कर्तव्यात कसूर करून कामामध्ये हालगर्जीपणा केल्यामुळे ही निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबित केलेले अधिकारी आणि कर्मचारी PSI जनार्दन काळे, PC विशाल ठोपले, स्वप्नील शिंदे, दिगंबर चंदनशिव, PSI मोहिनी डोंगरे, हवालदार आदेश शिवणकर, नाईक नाथाराम काळे, शिपाई पिरप्पा बनसोडे, शिपाई आमित जाधव हे उपस्थित होते.