
दौंड शहरासह ग्रामीण भागातील बेकायदा गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकून ते दौंड पोलिसांनी उद्ध्वस्त केले. तसेच शहरातील मटका, जुगार अड्ड्यावर धाड टाकून संबंधितांवर गुन्हे दाखल (Crime in Daund) करण्यात आले आहे.
पाटस : दौंड शहरासह ग्रामीण भागातील बेकायदा गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकून ते दौंड पोलिसांनी उद्ध्वस्त केले. तसेच शहरातील मटका, जुगार अड्ड्यावर धाड टाकून संबंधितांवर गुन्हे दाखल (Crime in Daund) करण्यात आले आहे.
दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या बेकायदा अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार, या पथकाने ठिकठिकाणी धाड टाकत नुकतीच मोठी कारवाई केली आहे. दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गिरीम परिसरातील राघोबानगर येथे मोकळ्या पडीक जागेत गावठी हातभट्टीची दारू सुरू असल्याचे निदर्शनास आले.
त्यामध्ये एक लोखंडी बॅलर, चार प्लास्टिकचे निळ्या रंगाचे बॅरल त्यामध्ये कच्चे रसायन व ५ लिटर गावठी हात भट्टीची तयार दारू व त्यास लागणारे इतर साधने असा एकूण ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमालासह जप्त करण्यात आला. तसेच शिंगटेमळा ओढ्याच्या कडेला एक लोखंडी बॅरलसह इतर अनेक वस्तू असा एकूण २८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी रुक्मिणी शांताराम पवार (वय ५५, रा. राघोबानगर गिरीम ता.दौंड जि.पुणे) व सुरेश पुनम पवार (वय २९, रा. राघोबानगर, गिरीम, ता. दौंड, जि.पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.