
मागील वर्षी जून २०२२ मध्ये शिंदे गटाने शिवसेनेसोबत फारकत घेत, भाजपासोबत सरकार स्थापन केलं. यानंतर मागील महिन्यात अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी बंडखोरी झाली. त्यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांसह शिंदे - फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले.
मुंबई – एकिकडे कालपासून आगामी लोकसभा मतदारसंघातील आढावा घेण्यासाठी ठाकरे गटाकडून बैठक सत्रांच आयोजन करण्यात आलं आहे. तर भाजपा देखील लवकरच लोकसभा मतदारसंघातील आढावा घेणार आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी 40 ते 45 जागा विरोधकांच्या महाविकास आघाडीला मिळतील, असा दावा एका अंतर्गत सर्व्हेक्षणात करण्यात आला आहे. त्यामुळं ट्रिपल इंजिन सरकारला म्हणजे शिंदे-पवार-फडणवीस सरकारला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. (Big blow to Shinde-Pawar-Fadnavis government? Chances of getting 40 out of 48 seats in the Lok Sabha elections, what does the survey say)
48 पैकी 40 जागा मविआला मिळणार…
दरम्यान, मागील वर्षी जून २०२२ मध्ये शिंदे गटाने शिवसेनेसोबत फारकत घेत, भाजपासोबत सरकार स्थापन केलं. यानंतर मागील महिन्यात अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी बंडखोरी झाली. त्यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांसह शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने एक अंतर्गत सर्वेक्षण केले होते. त्यात राज्यातील सर्वच 48 लोकसभा मतदार संघात जाऊन आढावा घेण्यात आला. शरद पवार गट, व शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या व काँग्रेस मिळून मविआला 40 ते 45 जागांवर विजय मिळेल, असं सर्वेक्षणातून माहिती समोर आली आहे.
ट्रिपल इंजिन सरकारला झटका
सत्ताधारी भाजप, शिंदे गट, अजित पवार गट यांना झटका बसणार असल्याचे या सर्वेतून समोर आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरे गटाने मिळून निवडणूक लढवल्यास मविआला फायदा होऊ शकतो. असं नाना पटोले म्हणाले. या सर्व्हे अंतर्गत आम्ही 48 मतदारसंघात जाऊन तेथील विद्यमान राजकीय स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. त्यानुसार आम्ही प्रत्येक वॉर्डात तयारी सुरु केली आहे. राज्यातील सर्वच भाजपविरोधी पक्षांना आम्ही सोबत घेऊ. असं पटोले म्हणाले. तसेच आम्ही केलेल्या सर्वेतून मविआला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळेल, असं नाना पटोले म्हणाले.